वारी एनर्जीजच्या आयपीओचं आज वाटप, तुम्हाला लागला की नाही कसं तपासणार? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  वारी एनर्जीजच्या आयपीओचं आज वाटप, तुम्हाला लागला की नाही कसं तपासणार? वाचा!

वारी एनर्जीजच्या आयपीओचं आज वाटप, तुम्हाला लागला की नाही कसं तपासणार? वाचा!

Oct 24, 2024 11:19 AM IST

Waaree Energies IPO allotment : वारी एनर्जीजच्या आयपीओचं वाटप आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

वारी एनर्जीजच्या आयपीओचं आज वाटप, तुम्हाला लागला की नाही कसं तपासणार? वाचा!
वारी एनर्जीजच्या आयपीओचं आज वाटप, तुम्हाला लागला की नाही कसं तपासणार? वाचा!

Stock Market Updates : सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी वारी एनर्जीजच्या आयपीओचं वाटप आज होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना अलॉटमेंटची उत्सुकता आहे.

१९९० मध्ये स्थापन झालेली ही देशातील सर्वात मोठी सोलर पॅनेल निर्मिती कंपनी आहे. वारी एनर्जीचा तीन दिवसांचा आयपीओ बुधवारी (२३ ऑक्टोबर) गुंतवणुकीसाठी बंद झाला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. शेवटच्या दिवशी वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दिवशी ७६.३४ पट सब्सक्राइब झाला. आयपीओसाठी १४२७ ते १५०३ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता.

एनएसईच्या आकडेवारीनुसार, ४३२१.४४ कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये विक्रीसाठी २,१०,७९,३८४ शेअर्स होते. मात्र, बोली १,६०,९१,६१,७४१ शेअर्ससाठी लागली होती. हा आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) श्रेणीत २०८.६३ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत ६२.४८ पट सब्सक्राइब करण्यात आला. तर, किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत (आरआयआय) १०.७९ पट सब्सक्रिप्शन आलं. वारी एनर्जीजनं शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांकडून १,२७७ कोटी रुपये गोळा केले.

वारी एनर्जीजचे आयपीओ रजिस्ट्रार लिंक

वारी एनर्जीज आयपीओ अलॉटमेंट स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर आणि बीएसई वेबसाइटवर ऑनलाइन घोषित केलं जाईल. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अधिकृत निबंधक आहे.

आयपीओ अलॉटमेंट स्टेटस असं तपासा ऑनलाइन 

वारी एनर्जीज आयपीओ अलॉटमेंट स्टेटस https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html आणि बीएसई वेबसाइटवर देखील जाहीर केलं जाईल.

लिंक इनटाइमच्या वेबसाईटवर फक्त पॅन कार्ड नंबर टाकून स्टेटस चेक करता येईल.

वारी एनर्जीजचा आयपीओ अलॉटमेंट स्टेटस बीएसईच्या https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर देखील जारी केला जाईल.

वारी एनर्जी आयपीओ ग्राहक बीएसई वेबसाइटवर अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकून अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात.

लिस्टिंगवर १०० टक्क्यांपेक्षा जास्त नफ्याचा अंदाज

वारी एनर्जीज आयपीओ जीएमपी बंपर लिस्टिंग दाखवत आहे. Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, शेअरचा जीएमपी आज १५६० रुपयांवर आला आहे. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ३०६३ रुपयांवर लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच लिस्टिंगवर सुमारे १०३% इतका भक्कम नफा मिळण्याची शक्यता आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner