stock market : एका शेअरवर १० बोनस शेअर देतेय ही कंपनी; तुमच्याकडं किती आहेत? लगेच करा हिशेब
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : एका शेअरवर १० बोनस शेअर देतेय ही कंपनी; तुमच्याकडं किती आहेत? लगेच करा हिशेब

stock market : एका शेअरवर १० बोनस शेअर देतेय ही कंपनी; तुमच्याकडं किती आहेत? लगेच करा हिशेब

Jul 26, 2024 05:06 PM IST

Bonus Shares News : व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक असलेल्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना घसघशीत बोनस जाहीर केला आहे.

stock market : एका शेअरवर १० बोनस शेअर देतेय ही कंपनी; तुमच्याकडं किती आहेत? लगेच करा हिशेब
stock market : एका शेअरवर १० बोनस शेअर देतेय ही कंपनी; तुमच्याकडं किती आहेत? लगेच करा हिशेब

Stock Market News : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना रोज काही ना काही बातम्या मिळत असतात. कधी एखादी कंपनी डिविडंड जाहीर करते, कधी बोनस देते तर कधी शेअर स्प्लिट होतात. त्यामुळं गुंतवणूकादारांनाही प्रचंड उत्सुकता असते. अशा उत्सुक गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. 

व्हीएसटी इंडस्ट्रीजनं आपल्या गुंतवणूकदारांना खास भेट दिली आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीजनं १०:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं त्यास मान्यताही दिली आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक शेअरमागे १० बोनस शेअर्स देणार आहे. पहिल्यांदाच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ ही निश्चित केली आहे.

दमानी यांच्याकडं आहेत ५ लाखांहून अधिक शेअर्स

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांची या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. दमानी यांनी अलीकडंच व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील आपला हिस्सा कमी केला आहे. दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील २.२६ टक्के हिस्सा ब्लॉक डील्सद्वारे विकला आहे. या ब्लॉक डीलनंतरही दमानी हे कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक असून त्यांचा ३५ टक्के हिस्सा आहे. राधाकिशन दमानी यांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये व्हीएसटी इंडस्ट्रीजचे ५,३५,१८५ शेअर्स आहेत. कंपनीत त्यांचा हिस्सा ३.४७ टक्के आहे. दमानी यांनी ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स, डेरिव ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स आणि दमानी इस्टेट अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूक कंपन्यांच्या माध्यमातून व्हीएसटी इंडस्ट्रीजत गुंतवणूक केली आहे. 

व्हीएसटीच्या शेअरचा भाव किती?

बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर व्हीएसटी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ उद्योगाशी संबंधित व्हीएसटी इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर शुक्रवारी ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ४,२९० रुपयांवर पोहोचला. गुरुवारी कंपनीचा शेअर ३९९३.७५ रुपयांवर बंद झाला होता. व्हीएसटी इंडस्ट्रीजचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४८५० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांचा नीचांक ३१५९.९० रुपये आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्हीएसटी इंडस्ट्रीजचा महसूल ३.५ टक्क्यांनी घसरून ३२१.३३ कोटी रुपये झाला आहे. तर, कंपनीचं एबिटा मार्जिन मागील वर्षीच्या ३१.६ टक्क्यांवरून २२.८ टक्क्यांवर आलं आहे. जून २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३६ टक्क्यांनी घसरून ५३.५८ कोटी रुपये झाला आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner