ग्राहकांची वाट बघत राहिली ही SUV, संपूर्ण जानेवारी महिन्यात मिळाला केवळ एकच खरेदीदार, जाणून घ्या किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ग्राहकांची वाट बघत राहिली ही SUV, संपूर्ण जानेवारी महिन्यात मिळाला केवळ एकच खरेदीदार, जाणून घ्या किंमत

ग्राहकांची वाट बघत राहिली ही SUV, संपूर्ण जानेवारी महिन्यात मिळाला केवळ एकच खरेदीदार, जाणून घ्या किंमत

Updated Feb 15, 2025 05:51 PM IST

VolkswagenTiguan : फोक्सवॅगन टिगुआनमध्ये ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे. तर सुरक्षेसाठी एसयूव्हीमध्ये ६-एअरबॅग्ज देखील देण्यात आल्या आहेत. बाजारात टिगुआन टोयोटा फॉर्च्युनरसारख्या कारशी स्पर्धा करते.

फॉक्सवैगन टिगुआन
फॉक्सवैगन टिगुआन

फोक्सवॅगनच्या या कार भारतीय ग्राहकांना खूप आवडतात. यामध्ये फोक्सवॅगन व्हर्टस, तायगुन आणि टिगुआन सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर फोक्सवॅगन व्हर्टस आणि तायगुनला १५०० हून अधिक ग्राहक मिळाले. मात्र यावेळी कंपनीची धांसू एसयूव्ही टिगुआन निराश झाली. गेल्या महिन्यात फोक्सवॅगन टिगुआनला केवळ १ ग्राहक मिळाला होता. या कालावधीत टिगुआनच्या विक्रीत वार्षिक आधारावर ९९.१२ टक्के घट झाली आहे. तर बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये फोक्सवॅगन टिगुआनला ११३ ग्राहक मिळाले होते.

दमदार इंजिनची एसयूव्ही -

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना फोक्सवॅगन टिगुआनमध्ये २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते जे जास्तीत जास्त १९० बीएचपीपॉवर आणि ३२० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनला ७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्स देण्यात आला आहे.

अत्याधुनिक फीचर्स  -

या एसयूव्हीमध्ये ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, क्लायमेट कंट्रोल आणि ३० कलर एम्बियंट लाइटिंग सारखे ग्राहक आहेत. याशिवाय एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाठी ६-एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कोणत्या कारशी आहे स्पर्धा -

फोक्सवॅगन टिगुआन भारतीय बाजारात स्कोडा कोडियाक, टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लॉस्टर, किआ स्पोर्ट्झ आणि ह्युंदाई टक्सन सारख्या कारशी स्पर्धा करते. या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत ३५.१७ लाख रुपये आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner