Vodafone-Idea Plan: भारतात उपलब्ध असलेल्या ओटीटी सेवांमध्ये नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन सर्वात महाग आहे म्हणून नेटफ्लिक्सचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन देणाऱ्या प्लानसह रिचार्ज करणे योग्य ठरते. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया हे सर्व मोफत नेटफ्लिक्स प्रीपेड प्लान ऑफर करतात. व्हीआयचे प्लान जिओ किंवा एअरटेल दोन्हीपेक्षा स्वस्त आहेत.
व्होडाफोन- आयडिया ग्राहकांना १ हजार १९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानसह मोफत नेटफ्लिक्स मिळत आहे आणि हा प्लान ७० दिवसांच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठविण्याचा पर्याय मिळतो. उर्वरित फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स सारखे फायदे आहेत.
व्हीआय युजर्सने या प्लॅनने रिचार्ज केल्यास ७० दिवसांच्या वैधतेसाठी नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन दिले जात आहे. कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरकडून दिला जाणारा हा सर्वात स्वस्त मोफत नेटफ्लिक्स प्लॅन आहे. Smartphone: चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन हवाय, पण बजेट कमी आहे? मग 'ही' बातमी नक्की वाचा
व्हीआयचा लाँग व्हॅलिडिटी फ्री नेटफ्लिक्स प्लान
जर तुम्हाला दीर्घ वैधता हवी असेल तर १ हजार ५९९ रुपये किंमतीचा व्हीआय प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगव्यतिरिक्त दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्यायही दिला जात आहे. या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स सारखे बेनिफिट्स देखील मिळतात. या प्लानमधून रिचार्ज केल्यास ग्राहकांना ८४ दिवसांच्या वैधतेसह नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन मिळत आहे. बेसिक सब्सक्रिप्शनचा फायदा म्हणजे युजर्स त्यांच्या मोबाइल डिव्हाइसव्यतिरिक्त लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कंटेंट स्ट्रीम करू शकतात.
एअरटेल ५०९ रुपयांच्या किंमतीत असाच वैधता प्लान ऑफर करत आहे. या प्लॅनमधून रिचार्ज केल्यास ८४ दिवसांच्या वैधतेसह एकूण ६ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय आहे. प्लानमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीमचा अॅक्सेस मिळतो, जेणेकरून ते फ्री टीव्ही शो, चित्रपट आणि लाइव्ह चॅनेल पाहू शकतील. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अपोलो २४/७ सर्कल आणि विनामूल्य हॅलोट्यून्स देखील फायदेशीर आहेत.
संबंधित बातम्या