
Vodafone Layoffs in Italy : अमेरिकेतील बँकींग संकटांच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्या आणि स्टार्टअप्स मंदीबद्दल जागरूक झाल्या आहेत. मंदीच्या भीतीमुळे गेल्या काही महिन्यांत जगभरातील दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. आता ब्रिटीश टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने कर्मचारी संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. व्होडाफोनने यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी ५ टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. भारतात, आयडियाच्या सहकार्याने व्होडाफोन भारतात दूरसंचार सेवा पुरवते.
व्होडाफोनने सोमवारी सांगितले की, ते खर्चात कपात करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि त्यासाठी ते इटलीतील आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. व्होडाफोन नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी संघटनांनी गेल्या आठवड्यात रॉयटर्सला टाळेबंदीची माहिती दिली होती.
व्होडाफोनने म्हटले आहे की, त्यांच्या एकूण वर्कफोर्समधील ५ टक्के हिस्सा कंपनी कमी करणार आहे. याचा अर्थ कंपनी अंदाजे १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राॅयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंपनीच्या मोठ्या खर्च- बचत योजनेचा भाग म्हणून आपल्या इटलीतील यूनिट्समधील कर्मचाऱी कपात कऱण्याचा निर्णय कंपनीने घेल्याचे म्हटले आहे.
व्होडाफोन इटलीने एका निवेदनात म्हटले आहे की, दूरसंचार क्षेत्रातील विलक्षण स्पर्धात्मक दबावामुळे महसूल आणि मार्जिनमध्ये घट झाल्यानंतर १००० नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. कंपनीने कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेतली असून त्यांना कामकाजात मोठ्या बदलांची आवश्यकता आहे. व्होडाफोनच्या नवीन वार्षिक अहवालानुसार, गेल्या मार्चपर्यंत इटलीमध्ये व्होडाफोनच्या कर्मचार्यांमध्ये एकूण ५,७६३ कर्मचारी होते.
अमेरिकन आर्थिक संकटामुळे अडचणी वाढल्या
अमेरिकेच्या आर्थिक संकटाने मंदीची भीती आणखी वाढवण्याचे काम केले आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक ऑफ यूएस बुडल्याने जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे. परिणामी, भविष्यात बाजार आणि मंदीच्या भीतीने कंपन्या पुन्हा छाटणीकडे वळत आहेत. याआधीही बाजार अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने जागतिक कंपन्यांचा महसूल, नफा आणि वाढीवर विपरीत परिणाम झाला होता. त्यानंतर कंपन्यांनी खर्चात कपात करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल केली. ट्विटर, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या
