Vi Share Price : बाजाराची चाल सावध असताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi Share Price : बाजाराची चाल सावध असताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; काय आहे कारण?

Vi Share Price : बाजाराची चाल सावध असताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; काय आहे कारण?

Jan 07, 2025 11:54 AM IST

Vodafone Idea Share Price : छोट्या गुंतवणूकदारांच्या कायम रडारवर असलेल्या व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज मोठी तेजी आहे. त्यामागे एक कारण आहे.

बाजाराची चाल सावध असताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; काय आहे कारण?
बाजाराची चाल सावध असताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; काय आहे कारण?

Share Market News : कर्जात बुडालेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात मोठी तेजी दिसून आली. व्होडाफोन आयडियानं आयबस नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडशी केलेला करार या तेजीला कारणीभूत ठरला आहे.

फायरफ्लाय नेटवर्क्स हा व्होडाफोन आयडिया लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडचा संयुक्त उपक्रम आहे. यात दोन्ही कंपन्यांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. व्होडाफोननं आता यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं फायरफ्लाय नेटवर्क्स लिमिटेडमधील आपला संपूर्ण ५० टक्के हिस्सा ४.५ कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे.

व्होडाफोन बरोबरच भारती एअरटेल लिमिटेडनंही फायरफ्लाय नेटवर्क्स लिमिटेडमधील आपला ५० टक्के हिस्सा आयबस नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला विकण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. दोन्ही कंपन्यांचे करार ३० दिवसांच्या आत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

किती वाढला शेअर?

व्होडाफोन आयडियाचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. मात्र, भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. व्होडाफोन आयडियाचा शेअर आज ७.८६ रुपयांवर उघडला आणि ८.०८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ५२ आठवड्यांतील उच्चांकी १९.१८ रुपये आणि नीचांकी स्तर ६.६१ रुपये आहे.

दुसरीकडे, भारती एअरटेलचा शेअर १५९४ रुपयांवर उघडला. त्यानंतर हा शेअर १६०३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि १५८६.२५ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरला. सकाळी दहाच्या सुमारास तो किरकोळ वाढीसह १५८९.५० रुपयांवर व्यवहार करत होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner