Vodafone Idea Recharge: देशातील दुरसंचार कंपनी व्होडाफोन- आयडिया आपल्या योजनांसह इतर कंपन्यांना कठीण स्पर्धा देत आहे. यामुळेच कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक प्लॅान ऑफर करते. भरमसाठ डेटाच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी व्होडाफोन आयडिया ९०१ रुपयांचा प्लान आणला. या प्लानमध्ये ग्राहकांना २०० हून अधिक विनामूल्य टीव्ही चॅनल फुकटात पाहायला मिळणार आहे.
व्होडाफोन आयडियाच्या ९०१ प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना ४८ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येत आहे. ७० दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादीत कॉलिंगसारखी सुविधा मिळत आहे.
या प्लानमध्ये ग्राहकांना मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्यादीत डेटा देखील मिळत आहे. तसेच ग्राहकांना Vi Movies आणि TV ॲपवर मोफत प्रवेशाचा लाभ देखील मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना २०० हून अधिक टीव्ही चॅनेल आणि ५००० हून अधिक चित्रपट मोफत पाहता येणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
जर ९०१ रुपयांचा प्लान खूप महाग वाटत असल्यास ग्राहक ५९९ रुपयांचा प्लान देखील निवडू शकता. ५९९ रुपयांचा प्लानमध्ये देखील ग्राहकांना ७० दिवसांची वैधता आणि इतर गोष्टी मिळतात. परंतु, या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. हा प्लान देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मोफत SMS ऑफर प्रदान करतो.
संबंधित बातम्या