gadgets news : मोबाईल वापरकर्त्यांना मोठा झटका! 'या' मोफत सेवा झाल्या बंद, आता मोजावे लागणार २४०० रुपये
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gadgets news : मोबाईल वापरकर्त्यांना मोठा झटका! 'या' मोफत सेवा झाल्या बंद, आता मोजावे लागणार २४०० रुपये

gadgets news : मोबाईल वापरकर्त्यांना मोठा झटका! 'या' मोफत सेवा झाल्या बंद, आता मोजावे लागणार २४०० रुपये

Published May 27, 2024 11:49 AM IST

vodafone idea removes free subscription : वोडाफोन आणि व्हीआय कंपनीने त्यांच्या सर्व योजनांमधून Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन काढून टाकले आहे. यामुळे वापरकर्त्यांना एकाच लॉगिनसह अनेक OTT ॲप्सचे मोफत लॉगिन मिळत होते. मात्र, कंपनीने यूझर्स साठी VI MTV Pro ऑफर आणली आहे.

वोडाफोन आणि व्हीआय कंपनीने त्यांच्या सर्व योजनांमधून Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन काढून टाकले आहे.
वोडाफोन आणि व्हीआय कंपनीने त्यांच्या सर्व योजनांमधून Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन काढून टाकले आहे.

vodafone idea removes free subscription : टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाने यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांच्या सर्व योजनांमधून Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन काढून टाकले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना एकाच लॉगिनसह अनेक OTT ॲप्सचा मोफत प्रवेश मिळत होता. वोडाफोन-आयडियाची प्लॅनसह येणारी ही मोफत सुविधा वापरकर्त्यांना खूप आवडली होती. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, हा फायदा आता कंपनीच्या वेबसाइट किंवा ॲपवर कोणत्याही प्लॅनमध्ये दिसणार नाही. असे मानले जाते की कंपनीने आपल्या पेड सब्सक्रिप्शनसह वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल; एकूण निकाल ९५.८१ टक्के, मुलींनी मारली बाजी

Vi MTV Pro चे सदस्यत्व घ्यावे लागणार

वोडाफोन-आयडियाने आता वापरकर्त्यांना Vi MTV Pro प्लान ऑफरमध्ये आणला आहे. यासाठी यूजर्सला दर महिन्याला २०२ रुपये खर्च करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांना एका वर्षाचे सबस्क्रिप्शन शुल्क २४०० रुपयांपेक्षा जास्त द्यावे लागणार आहे. वार्षिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना कंपनी कोणत्याही प्रकारची सूट देत नाही. या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूझर्सना Disney + Hotstar, Sony Liv, Fancode, Hungama आणि Chaupal यासह एकूण १४ OTT ॲप्स मोफत वापरता येणार आहे.

९०४ रुपयांचा प्लॅन लाँच

वोडाफोन-आयडियाने वापरकर्त्यांसाठी ९०४ रुपयांचा नवीन अमर्यादित प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा मिळेल. दररोज १०० मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. कंपनी या प्लॅनच्या ग्राहकांना अनेक अतिरिक्त फायदे देखील देत आहे. यामध्ये Binge ऑल नाईट देखील समाविष्ट आहे, जे मध्यरात्री १२ ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा प्रदान करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा डिलाइट्सचा लाभ देखील मिळेल. यामध्ये कंपनी दर महिन्याला 2 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. कंपनीचा हा नवीन प्लान प्राइम व्हिडिओ लाइटच्या फ्री सब्सक्रिप्शनसह येतो. या प्लॅनची ​​वैधता ९० दिवसांची आहे.

Whats_app_banner