VI Plans: ५० जीबी एक्स्ट्रा डेटा, २०० हून अधिक टीव्ही चॅनल फ्री; एक वर्षासाठी अनिलिमिटेड कॉलिंग-vodafone idea offering 365 days validity plan with free data and exciting additional benefit ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  VI Plans: ५० जीबी एक्स्ट्रा डेटा, २०० हून अधिक टीव्ही चॅनल फ्री; एक वर्षासाठी अनिलिमिटेड कॉलिंग

VI Plans: ५० जीबी एक्स्ट्रा डेटा, २०० हून अधिक टीव्ही चॅनल फ्री; एक वर्षासाठी अनिलिमिटेड कॉलिंग

Jan 13, 2024 05:12 PM IST

Vodafone Idea Prepaid Plans: व्होडाफोन आयडीने त्यांच्या ग्राहकांसाठी खास लॉन्ग टर्म वॅलिडिटी भन्नाट प्लान आणला आहे.

Vodafone Idea
Vodafone Idea

Prepaid Plan: लॉन्ग टर्म वॅलिडिटीसह बेस्ट प्लान शोधणाऱ्यांसाठी व्होडाफोन- आयडियाने धमाकेदार प्लान आणला आहे. कंपनीचा हा प्लान ३६५ दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. विशेष बाब म्हणजे, कंपनी या प्लानमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ५० जीबी अधिक डेटा देखील देत आहे. प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. दररोज १०० मोफत एसएमएस देणारा हा प्लान अनेक अतिरिक्त सुविधांसह येतो.

या प्लानमध्ये ऑल नाइट बेनिफिट मिळते. मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्यादित डेटा मिळतो. यासाठी कोणतेही वेगळे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या कालावधीत वापरला जाणारा डेटा दैनिक डेटा कोट्यातून कमी केला जाणार नाही. प्लानमध्ये वीकेंड डेटा रोल ओव्हरचा फायदाही दिला जाणार आहे. याशिवाय, प्लानमधील डेटा डिलाइट्समध्ये दरमहा २ जीबी बॅकअप डेटा देखील मिळत आहे. कंपनी या प्लानच्या वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV अॅप मोफत वापरता येते, ज्यात ५ हजारांहून अधिक चित्रपट आणि २०० हून अधिक टीव्ही चॅनल पाहायला मिळतात.

१८० दिवसांच्या प्लानमध्ये ३० जीबी अधिक मोफत डेटा

कंपनीचा हा प्लान १ हजार ४४९ रुपयांचा आहे, जो १८० दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. कंपनी या प्लानमध्ये दररोज १५ जीबी डेटा देत आहे. प्लानच्या वापरकर्त्यांना अॅपद्वारे रिचार्ज केल्यावर ५० रुपयांची सूट आणि ३० जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. व्होडाफोन आयडियाचा हा प्लान दररोज १०० मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देतो. या प्लानमध्ये तुम्हाला Binge All Night, Data Delights आणि Weekend Data Rollover देखील मिळते. प्लानमध्ये कंपनी VI Movies आणि TV अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

विभाग