Vivo Y36c Budget smartphone Launched: विवोने आपला नवा स्मार्टफोन विवो वाय ३६ सी जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ११ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. विवोने हा फोन चार वेग वेगवेगळ्या व्हेरियंट आणि तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. हा फोन दिसायलाही सुंदर आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
विवोने सध्या हा फोन आपल्या होम मार्केटमध्ये म्हणजेच चीनमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, जो ८४० निट्सचा पीक ब्राइटनेस प्रदान करतो. या फोनमध्ये डोळ्यांच्या संरक्षणासाठी लो ब्लू लाइट आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा वॉटरड्रॉप नॉचमध्ये लावण्यात आला आहे. याची खालची बेडवॉल साइड बेझल्सपेक्षा थोडी रुंद असते. मात्र, हा फोन फ्लॅट फ्रेम आणि मॉडर्न डिझाइनसह येतो. फोनच्या बॅक पॅनेलवर मोठा आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. फोनची रुंदी ८.५३ मिमी असून त्याचे वजन फक्त १८५ ग्रॅम आहे.
विवो वाय ३६ सी मध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ६ एनएम प्रक्रियेवर तयार करण्यात आला आहे. यात २×२.४ गीगाहर्ट्झ कॉर्टेक्स-ए७६ कोर + ६×२.० गीगाहर्ट्झ कॉर्टेक्स- ए५५ कोर आणि जीपीयू आर्म माली-जी५७ एमसी २ सह '२+६' कोअर आर्किटेक्चरचा अवलंब करण्यात आला आहे.
विवो वाय ३६ सीच्या ६ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९९ युआन (सुमारे १०,५०० रुपये), ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९९९ युआन (सुमारे ११,७०० रुपये), ८ जीबी रॅम+ २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,०९९ युआन (सुमारे १२,९०० रुपये) आणि १२ जीबी रॅम+ २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १ हजार २९९ युआन (सुमारे १५,३०० रुपये) आहे.
या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. धूळ आणि वॉटर प्रूफिंगसाठी आयपी ५४ रेटिंग देण्यात आले आहे. विवोने हा बजेट फ्रेंडली फोन चार वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. हे फोन कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.