Vivo Y29: भारतात विवो व्हाय २९ 5G चार व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता; इतकी असू शकते किंमत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo Y29: भारतात विवो व्हाय २९ 5G चार व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता; इतकी असू शकते किंमत!

Vivo Y29: भारतात विवो व्हाय २९ 5G चार व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता; इतकी असू शकते किंमत!

Dec 19, 2024 11:54 PM IST

Vivo Y29 5G Features Leak: विवो व्हाय २९ 5G ची किंमत भारतात लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. या फोनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

वो व्हाय २९ 5G चार व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता
वो व्हाय २९ 5G चार व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता

Vivo Y29 5G Price And Features: विवो भारतात विवो वाय २९ सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लाँचिंगपूर्वीच फोनच्या किंमतीचा तपशील लीक झाला आहे. लीक झालेल्या किंमती पाहता याला मिड-रेंज प्राइस रेंजमध्ये लॉन्च केले जाईल, असे सांगितले जात आहे. किंमतीसोबतच फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्सचा तपशीलही समोर आला आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन चार वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

मायस्मार्टप्राइसने टिप्सटर सुधांशु अंभोरे यांच्या हवाल्याने आपल्या रिपोर्टमध्ये विवो वाय २९ 5G च्या भारतीय किंमतीची माहिती दिली आहे. टिप्स्टरने मायस्मार्टप्राइससोबत शेअर केलेले मार्केटिंग मटेरियल दर्शविते की ते चार कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसह येईल. लीकनुसार, भारतात फोनच्या ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये, ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये, ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये असेल. विवोच्या ८ जीबी व्हेरिएंटवर १,५०० रुपये आणि ४ जीबी व्हेरिएंटवर १००० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. फुल स्वाइप ट्रान्झॅक्शनवर ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

मार्केटिंग मटेरियलमध्ये असेही दिसून आले आहे की फोन ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयसह उपलब्ध असेल. आयडीएफसी फर्स्ट बँक, डीबीएस बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक, एयू बँक, एसबीआय, येस बँक, जम्मू-काश्मीर बँक आणि बँक ऑफ बडोदा मधील व्यवहारांसाठी कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआयपर्याय उपलब्ध असतील.

विवो व्हाय २९ 5G (संभाव्य फीचर्स)

नुकतेच समोर आले आहे की यात सेंट्रलाइज्ड पंच होल कटआऊटसह ६.६९ इंचाचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेट आणि ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार ५०० एमएएच बॅटरी असेल. विवोचा हा फोन ग्लेशियर ब्लू, टायटॅनियम गोल्ड आणि डायमंड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च होईल. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि ०.०८ मेगापिक्सलचा क्यूव्हीजीए सेकंडरी कॅमेरा असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. विवो वाय २९ 5Gआयपी ६४ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग, एसजीएस प्रमाणपत्र आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स रेटिंगसह येईल. स्मार्टफोनची जाडी ८.१ मिमी असून त्याचे वजन १९८ ग्रॅम असण्याची शक्यता आहे.

 

Whats_app_banner