मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo: सॅमसंग आणि वनप्लसला टक्कर देण्यासाठी येतोय विवोचा धमाकेदार फोन, मिळणार दमदार फीचर्स

Vivo: सॅमसंग आणि वनप्लसला टक्कर देण्यासाठी येतोय विवोचा धमाकेदार फोन, मिळणार दमदार फीचर्स

Feb 11, 2024 04:27 PM IST

Smartphone Under 20000: लवकरच विवोचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.

Vivo Upcoming Smartphone
Vivo Upcoming Smartphone

Vivo Y200e 5G: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो त्यांचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने आगामी स्मार्टफोनचे नाव विवो व्हाय २०० इ असे दिले, असल्याची माहिती आहे. हा भारतात कधी लॉन्च होईल? याबाबत कंपनीकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगपूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यातच भारतीय बाजारात दाखल होईल. दरम्यान, विवो व्हाय २०० ई स्मार्टफोनमधील खास फीचर्स आणि किंमतबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. या स्मार्टफोनची अंदाजे किंमत २० हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या फोनची भारतात उपलब्ध असलेल्या ओप्पो ए७९,सॅमसंग गॅलेक्सी ए १५ आणि वनप्लस नॉर्ड सीई ३ लाईट यांच्याशी स्पर्धा असेल.

लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फूल एटचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, जो १२० HZ च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनचा ब्राइटनेस डिस्प्ले १२०० निट्स असू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ८ रॅम या पर्यायासह बाजारात लॉन्च करेल, अशी माहिती आहे. या फोनची रॅम क्षमता ८ जीबी रॅमपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा मिळू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

कंपनी या फोनमध् ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देणार आहे, जी ४४ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. शक्तिशाली आवाजासाठी, यात ३०० टक्के ऑडिओ बूस्टर सपोर्टसह ड्युअल स्पीकर सेटअप असणार आहे. हा फोन Android १४ वर आधारित असेल. फोनच्या डायमंड ब्लॅक वेरिएंटचे वजन १८५ ग्रॅम आणि सेफ्रॉन डिलाइटचे वजन १९१ ग्रॅम असेल.

WhatsApp channel