विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन विवो वाय २०० ई 5G आज भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे हा स्मार्टफोन इकोफायबर लेदर डिझाइनसह लान्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरू शकतो.
विवो वाय २०० ई ५ जी मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा अल्ट्रा व्हिजन एमोलेड पंच होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले एसजीएस लो ब्लू लाइट आय केअरने प्रमाणित केला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ३ लाइट, रेडमी नोट १३, मोटो जी ८४ आणि बरेच काही यासारख्या स्मार्टफोनला कडवी टक्कर देऊ शकते
फोटो कॅप्चर करण्यासाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल बोकेह कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळत आहे, यात पोर्ट्रेट बोकेह, सुपर नाईट मोड, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि बरेच काही देण्यात आले आहे.
विवो वाय २०० ई मध्ये ५ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ४४ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑडिओबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये ३०० टक्के व्हॉल्यूमचा ऑडिओ बूस्टर आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर सेटअप देण्यात आला आहे.
विवो वाय २०० ई केसर डिलाइट आणि ब्लॅक डायमंड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअर्सवरून या स्मार्टफोनची प्री- बुकिंग करता येऊ शकते.