Vivo Upcoming Smartphones: विवोने फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला नवीन स्मार्टफोन विवो व्हाय १००टी 5G लॉन्च केला आहे. कंपनीने सध्या हा नवीन व्हाय १०० सीरीज फोन म्हणून चीनी बाजारात लॉन्च केला आहे.या सीरिजमध्ये विवो व्हाय १००टी आणि विवो व्हाय १०० आय यांचा समावेश आहे. या फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
विवो व्हाय १००टी 5G मध्ये ६.६४ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळत आहे, जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन MediaTek Dimension ८२०० प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ८ जीबी/१२८ जीबी रॅम, ८ जीबी/२५६ जीबी रॅम आणि ८ जीबी/५१२ जीबी रॅम इनबिल्ट स्टोरेज आहे. फोन कोणत्या OS आवृत्तीवर काम करतो याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
फोनमध्ये १२० वॅट फास्ट चार्जिंगसह ५ हजार एमएएच बॅटरी आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. रिव्हरमध्ये OIS सपोर्टसह ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या इतर खास वैशिष्ट्यांमध्ये NFC, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे. फोन पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन रंगात उपलब्ध आहे. या फोनची किंमत अद्याप समोर आली नाही. या फोनच्या किंमतीबाबत २३ फेब्रुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या