Vivo X200: विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक; १२ डिसेंबरला लॉन्च होतील 'हे' दोन नवे फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo X200: विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक; १२ डिसेंबरला लॉन्च होतील 'हे' दोन नवे फोन!

Vivo X200: विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक; १२ डिसेंबरला लॉन्च होतील 'हे' दोन नवे फोन!

Dec 11, 2024 03:10 PM IST

Vivo X200 Series Price Leak: विवो एक्स २०० सीरिजमधील दोन फोन भारतात १२ डिसेंबरला लॉन्च होणार आहे. लाँचिंगपूर्वी या टिप्सटरने या फोनच्या किंमतींचा खुलासा केला आहे.

विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक
विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक

Vivo Upcoming Smartphone: विवो एक्स२०० सीरिजचा फोन उद्या म्हणजेच १२ डिसेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी भारतीय युजर्सला विवो एक्स २०० आणि एक्स २०० प्रो असे दोन नवे फोन ऑफर करणार आहे. दरम्यान, फोन लॉन्च होण्याआधीच एका टिप्सटर अभिषेक यादवने या फोनच्या किंमती लीक केल्या आहेत. सांगितलेल्या किंमतींवरून असे म्हटले जात आहे की, एक्स २०० सीरिजचे फोन एक्स १०० सीरिजपेक्षा महाग असतील.

टिप्सटरनुसार, विवो एक्स २०० १२ जीबी + २५६ जीबी आणि १६ जीबी+ ५१२ जीबी अशा दोन व्हेरियंटमध्ये येईल. फोनच्या १२ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६५ हजार ९९९ रुपये आणि १६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ७१ हजार ९९९ रुपये असेल. तर, १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या एक्स२०० प्रोची किंमत ९४ हजार ९९९ रुपये आहे. विवो एक्स १०० बद्दल बोलायचे झाले तर हा फोन कंपनीने ६३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला. एक्स १०० प्रोबद्दल बोलायचे झाले तर त्याची लॉन्चिंग किंमत ८९ हजार ९९९ रुपये आहे. विवो एक्स २०० सीरिजचा फोन १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर १९ डिसेंबरपासून त्यांचा सेल सुरू होणार आहे. कंपनीचे हे फोन २०० मेगापिक्सेलपर्यंतटेलिफोटो सेन्सरसह येणार आहेत.

विवो एक्स २०० मध्ये ६.६७ इंचाचा आणि एक्स २०० प्रोमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला एक्स २०० मध्ये डायमेंसिटी ९४०० चिपसेट आणि प्रो व्हेरियंटमध्ये ९३०० चिपसेट पाहायला मिळेल. एक्स२०० मध्ये फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे मिळतील. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य लेन्ससह ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स चा समावेश आहे.

एक्स २०० प्रोबद्दल बोलायचे झाले तर कंपनी ५० मेगापिक्सलचा मेन लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह २०० मेगापिक्सलचा झेडईएसएस एपीओ टेलिफोटो लेन्स देणार आहे. हा फोन व्ही ३+ इमेजिंग प्रोसेसरसह येणार आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी एक्स २०० मध्ये ५८०० एमएएच आणि एक्स २०० प्रो मध्ये ६००० एमएएच बॅटरी देणार आहे. दोन्ही फोनमध्ये कंपनी ९० वॅटफास्ट चार्जिंग सपोर्ट देणार आहे.

Whats_app_banner