Vivo vs OnePlus: विवो एक्स फोल्ड ३ प्रो की वनप्लस ओपन? कोणता फोल्डेबल फोन चांगला? जाणून घ्या दोघांमधील फरक
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo vs OnePlus: विवो एक्स फोल्ड ३ प्रो की वनप्लस ओपन? कोणता फोल्डेबल फोन चांगला? जाणून घ्या दोघांमधील फरक

Vivo vs OnePlus: विवो एक्स फोल्ड ३ प्रो की वनप्लस ओपन? कोणता फोल्डेबल फोन चांगला? जाणून घ्या दोघांमधील फरक

Updated Jun 10, 2024 08:25 PM IST

Vivo X Fold 3 Pro vs OnePlus Open: विवो एक्स फोल्ड ३ प्रोची किंमत एक लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे. तर, वनप्लस ओपनची किंमत १ लाख ३९ हजार ९९९ रुपये आहे. यापैकी कोणता फोल्डेबल स्मार्टफोन चांगला आहे? हे जाणून घेऊयात.

विवो एक्स फोल्ड ३ प्रो की वनप्लस ओपन यापैकी कोणता फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करावा, वाचा
विवो एक्स फोल्ड ३ प्रो की वनप्लस ओपन यापैकी कोणता फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करावा, वाचा (Vivo/ OnePlus)

Best Foldable Smartphones: विवो एक्स फोल्ड 3 प्रो ने गेल्या आठवड्यात भारतीय फोल्डेबल मार्केटमध्ये पदार्पण केले. स्मार्टफोनमध्ये केवळ पातळ डिझाइनच नाही तर, स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटला सपोर्ट करणारा हा भारताचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. एक्स फोल्ड ३ प्रो फोल्डेबल स्मार्टफोनचे अनेक अडथळे मोडत आहे, परंतु त्याची थेट स्पर्धा मागील वर्षीच्या वनप्लस ओपनशी आहे, जे त्याच्या स्लीक आणि लाइटवेट डिझाइनमुळे चर्चेत होता. जाणून घ्या विवो एक्स फोल्ड ३ प्रो आणि वनप्लस ओपन एकमेकांपासून कसे वेगळे आहेत.

विवो एक्स फोल्ड ३ प्रो विरुद्ध वनप्लस ओपन

डिझाइन:

विवो एक्स फोल्ड ३ प्रो फोल्ड केल्यावर ११.२ मिमी आणि उघडल्यावर ५.२ मिमी आहे. या स्मार्टफोनचे वजन केवळ २३६ ग्रॅम असून आर्मर आर्किटेक्चरसह विकसित करण्यात आले आहे. तर वनप्लस ओपनचे वजन २३९ ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन टायटॅनियम अलॉय आणि कार्बन फायबर हिंजसह तयार करण्यात आला, ज्यामुळे तो लाइटवेट फोल्डेबल बनतो.

डिस्प्ले:

विवो एक्स फोल्ड ३ प्रो मध्ये ६.५३ इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि एमोलेड आणि एलटीपीओ ८ टेक्नॉलॉजीसह ८.०३ इंचाचा मेन फोल्डेबल डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४ हजार ५०० निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. तर, वनप्लस ओपनमध्ये ६.३१ इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि ७.८२ इंचाचा मेन डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले एलटीपीओ ३.० डिस्प्ले टेक्नॉलॉजी, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २ हजार ८०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह सुपर फ्लुइड एमोलेड सपोर्ट करतात.

कॅमेरा:

उच्च-गुणवत्तेच्या फोटोग्राफीसाठी विवो एक्स फोल्ड ३ प्रोमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सल व्हीसीएस मुख्य कॅमेरा आहे. ५० मेगापिक्सल वाइड-अँगल एएफ कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ एमपी टेलिफोटो कॅमेरा. वनप्लस ओपनसाठी ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे, जी ४० मेगापिक्सल सोनी एलवायटी-टी ८०८ मुख्य कॅमेरा, ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ मेगापिक्सल ओमनीव्हिजन ओव्ही ६४ बी कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सल सोनी आयएमएक्स ५८१ अल्ट्रा-वाइड कॅमेरासह येते.

परफॉर्मन्स:

मल्टीटास्किंग क्षमतेसाठी विवो एक्स फोल्ड ३ प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, वनप्लस ओपन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज LPDDR5X आहे. विवो एक्स फोल्ड ३ प्रो मध्ये ५ हजार ७०० एमएएच बॅटरी आहे जी १०० वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरीकडे, वनप्लस ओपनमध्ये ४ हजार ८०५ एमएएच बॅटरी आणि ६७ वॅट सुपरवूक चार्जिंग आहे.

किंमत:

विवो एक्स फोल्ड ३ प्रोची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आणि वनप्लस ओपनची सुरुवातीची किंमत १ लाख ३९ हजार ९९९ रुपये आहे.

Whats_app_banner