Vivo V40e 5G Price and Features: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सध्या बिग बिलियन डेज सेल सुरू असून ग्राहक बंपर डिस्काउंटवर बरीच उत्पादने खरेदी करू शकतात. बजेट सेगमेंटमध्ये कर्व्ड डिस्प्ले आणि ५० एमपी सेल्फी कॅमेरा असलेला विवो व्ही ४० ई फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. हे डिव्हाइस मिड-रेंज किंमतीत लॉन्च करण्यात आले. परंतु, आता ते ४००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकते.
लक्झरी डिझाईन असलेल्या विवो व्ही ४० ई वर ग्राहकांना खास डील्सचा फायदा मिळत आहे. या फोनमध्ये थ्रीडी कर्व्ड डिस्प्लेव्यतिरिक्त ८० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जात आहे. कॅमेऱ्याच्या कामगिरीच्या बाबतीत, हे डिव्हाइस मजबूत आहे आणि आयपी ६४ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे. या फोनमध्ये ऑरा लाइट पोर्ट्रेटचा पर्याय देण्यात आला असून ५० एमपी आय ऑटो-फोकस ग्रुप सेल्फी कॅमेरासारखे पर्याय देण्यात आले आहेत.
विवो व्ही ४० ई भारतीय बाजारात २८ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. या डिव्हाइसवर कोणत्याही बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड भरल्यास २ हजार ९०० रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, निवडक मॉडेल्सवर १ हजार ४५० रुपयांचे एक्स्ट्रा एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. अशा प्रकारे डिव्हाइसवर ग्राहकांना ४००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो. एक्स्चेंज डिस्काऊंटची किंमत जुन्या डिव्हाइसच्या मॉडेल आणि स्थितीनुसार निश्चित केली जाते. हे डिव्हाइस मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ या दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
अँड्रॉइड १४ वर आधारित फनटचओएस १४ आहे आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी विवो व्ही ४० ई 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर ५० एमपी प्रायमरी आणि ८ एमपी सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी विवो फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनच्या ५००० एमएएच क्षमतेच्या बॅटरीला ८० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा ही फायदा देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या