Vivo V40 Pro Sale in India Today: विवोने नुकतीच भारतात व्ही ४० सीरिज लॉन्च केली आहे, ज्यात विवो व्ही ४० आणि व्ही ४० प्रो मॉडेलचा समावेश आहे. विवो व्ही ४० प्रो ची पहिली विक्री आजपासून भारतात सुरू झाली. या विवो व्ही ४० प्रो मध्ये मीडियाटेक ९२००+ प्रोसेसर आहे, फास्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करते आणि ८० वॅट फास्ट चार्जिंगसपोर्ट करते. याची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि सेल ऑफर्सवर एक नजर टाकूयात.
विवो व्ही ४० प्रोच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी मॉडेलची किंमत ५५ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन गंगा ब्लू आणि टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध आहे. आजपासून फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि विविध रिटेल पार्टनर्सकडून खरेदी करता येणार आहे. ग्राहक १० टक्के त्वरित कॅशबॅक आणि १२ महिन्यांच्या झिरो डाउन पेमेंट योजनेसारख्या ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांमध्ये विवोच्या अपग्रेड प्रोग्रामद्वारे ग्राहकांना विवो व्ही-शील्डवर ४० टक्क्यांपर्यंत सूट आणि १० टक्के एक्स्चेंज बोनस मिळू शकतो.
विवो व्ही ४० प्रो मध्ये ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १२६० बाय २८०० पिक्सल आहे, जे एचडीआर १०+ आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करते. या फोनचे वजन १९२ ग्रॅम आहे. हे ड्युअल सिम (नॅनो-सिम, ड्युअल स्टँड-बाय) आणि ईसिम सपोर्ट करते. हे डिव्हाइस ऑक्टा-कोर सीपीयू आणि इम्मॉर्टलिस-जी ७१५ एमसी ११ जीपीयूसह मीडियाटेक डायमेंसिटी ९२००+ चिपसेटद्वारे संचालित आहे आणि फनटच १४ सह अँड्रॉइड १४ वर चालते.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ५० एमपी वाइड लेन्स, २ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० एमपी टेलिफोटो लेन्स आणि ५० एमपी अल्ट्रावाइड लेन्स, झेस ऑप्टिक्स आणि ऑरा रिंग-एलईडी फ्लॅशसह ट्यून मिळत आहे. याशिवाय गायरो-ईआयएस आणि ओआयएसचा वापर करून ३० फ्रेम प्रति सेकंद या वेगाने 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बॅटरीच्या बाबतीत, विवो व्ही ४० प्रो मध्ये ८० वॅट वायर्ड आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंग क्षमतेसह ५ हजार ५०० एमएएच बॅटरी आहे.