मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo V30 Series: विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo V30 Series: विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 07, 2024 03:32 PM IST

Vivo V30 and Launched: विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन विवो व्ही ३० आणि विवो व्ही ३० प्रो भारतात लॉन्च करण्यात आले.

Vivo V30 and Vivo V30 Pro have been launched in India.
Vivo V30 and Vivo V30 Pro have been launched in India. (Vivo)

Vivo V30 Series Launched in India: विवोने बहुप्रतीक्षित विवो व्ही ३० सीरिज अधिकृतपणे भारतात लॉन्च केली. या सीरिजमध्ये विवो व्ही ३० (Vivo V30) आणि विवो व्ही ३० प्रो (Vivo V30 Pro) या दोन उत्कृष्ट मॉडेल्सचा समावेश आहे. दरम्यान, विवो व्ही ३० सीरिजच्या फोनची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात, जे भारतीय स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालण्यास तयार आहेत.

विवो व्ही ३० मध्ये मोठा ६.७८ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळत आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल रिअर सेटअप कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 12 series launched: रियलमी १२ सीरिज भारतात लॉन्च; फीचर्सपासून किंमतीपर्यंत A टू Z माहिती

विवो व्ही ३० प्रो मध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी पॅनेल आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह समान डिस्प्ले सेटअप आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ८२०० चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. व्ही ३० प्रोमध्ये एक प्रभावी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनममध्ये (५०+ ५०+५०) मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S23 Ultra: अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5G च्या खरेदीवर भरघोस सूट

८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे आणि १२ जीबी रॅम/५१२ स्टोरेज जीबी व्हेरिएंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. स्टँडर्ड व्ही ३० च्या ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३ हजार ९९९ हजार रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे.  १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे.

विवो व्ही ३० सीरिजच्या प्री-बुकिंगला आजपासून सुरूवात होत आहे आणि हा फोन येत्या १४ मार्चपासून फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामध्ये एचडीएफसी बँक आणि एसबीआयवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट आणि ४००० रुपयांपर्यंत अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे. ग्राहकांना ६ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. विवो व्ही- शील्ड प्लॅनवर ८ महिन्यांच्या झिरो-डाउन पेमेंटसह १० टक्के इन्स्टंट कॅशबॅक आणि ४० टक्के सूट मिळत आहे.

WhatsApp channel

विभाग