Mid- Range Smartphones: प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग विवो आणि मोटोरोलाचे नुकतेच लॉन्च झालेले विवो टी ३ अल्ट्रा आणि मोटोरोला एज ५० प्रो हे दोन्ही फोन चांगला पर्याय ठरू शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आले, ज्यांची प्रचंड चर्चा होती. हे दोन्ही फोनने बाजारात धुमाकूळ घातला असून यापैकी कोणता फोन खरेदी करावा, याबाबत ग्राहक कन्फ्यूज आहेत. आज आपण दोन्ही स्मार्टफोनमधील फरक जाणून घेऊयात.
डिस्प्ले: विवो टी ३ अल्ट्रामध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४ हजार ५०० निट्स पीक ब्राइटनेससह ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. तर, मोटोरोला एज ५० प्रोमध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा पीओएलईडी डिस्प्ले आणि २००० निट्स पीक ब्राइटनेस आहे.
कॅमेरा: विवो टी ३ अल्ट्रामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएस सपोर्टसह ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. दुसरीकडे, मोटोरोला एज ५० प्रोमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० एमपी ओआयएस मुख्य कॅमेरा, १३ एमपी अल्ट्रावाइड आणि १० एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
परफॉर्मन्स आणि बॅटरी: विवो टी ३ अल्ट्रामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९२००+ प्रोसेसर सह १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज आहे. दुसरीकडे, मोटोरोला एज ५० प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ सह १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह सुसज्ज आहे. विवो टी ३ अल्ट्रा मध्ये ५ हजार ५०० एमएएच बॅटरी आहे, जी ८० वॅट चार्जिंग सपोर्टसह येते. एज ५० प्रो मध्ये ४ हजार ५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी १२५ वॅट चार्जरला सपोर्ट करते.
किंमत: विवो टी ३ अल्ट्रा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची सुरुवातीची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. तर, मोटोरोला एज ५० प्रो च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे.