Vivo T3 Pro 5G Launched In India: विवोने अखेर आपला नवीन स्मार्टफोन टी ३ प्रो 5G भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हे मॉडेल टी ३, टी ३ एक्स आणि टी ३ लाइटमध्ये सामील होऊन टी ३ मालिकेचा विस्तार केला आहे. विवो टी ३ प्रो 5G मध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड कर्व्ड डिस्प्ले, ५५०० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो टी ३ प्रो 5G सँडस्टोन ऑरेंज आणि एमराल्ड ग्रीन या दोन रंगात येतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहकांना ३ सप्टेंबररोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट, विवोची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेट्सवरून हँडसेट खरेदी करता येणार आहे.
लॉन्च ऑफर्स एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ३००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.
विवो टी ३ प्रो 5G मध्ये ६.७७ इंचाचा फुल एचडी+ 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याची चमक ४५०० निट्सपर्यंत आहे आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरवर चालते, ग्राफिक्स हाताळण्यासाठी एड्रेनो ७२० जीपीयूसमर्थित आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज सपोर्ट करतो.
फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८८२ प्रायमरी सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (ईआयएस) सह ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ५५०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे अँड्रॉइड १४ वर आधारित फनटच ओएस १४ वर चालते आणि विवो दोन वर्षांचे ओएस अपडेट आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन देण्यात आले.