Vivo T3 5G Sale: विवो टी३ फोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; डिस्प्लेपासून ते बॅटरीपर्यंत सगळंच भारी!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo T3 5G Sale: विवो टी३ फोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; डिस्प्लेपासून ते बॅटरीपर्यंत सगळंच भारी!

Vivo T3 5G Sale: विवो टी३ फोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; डिस्प्लेपासून ते बॅटरीपर्यंत सगळंच भारी!

Mar 28, 2024 01:02 PM IST

Vivo T3 5G sale in India: विवो टी३ 5G आजपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन विवो टी३ 5G आजपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन विवो टी३ 5G आजपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. (Flipkart)

Vivo T3 5G Price and Specs: बहुप्रतीक्षित विवो टी ३ 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने विवो प्रेमींच्या आनंदात भर पडली आहे. मिड-रेंज पॉवरहाऊस म्हणून ओळखला जाणारा विवो टी ३ 5G परफॉर्मन्स-ओरिएंटेड स्मार्टफोन अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या युजर्ससाठी लॉन्च करण्यात आला आहे.  या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि उपलब्धताबाबत जाणून घेऊयात.

विवो टी 3 5G आज दुपारी १२ वाजल्यापासून एक्सक्लुझिव्ह फ्लिपकार्ट आणि विवो स्टोअरवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून केलेल्या व्यवहारांवर विवो २ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे.

याव्यतिरिक्त, खरेदीदारांना फ्लॅट २ हजार रुपये अतिरिक्त एक्सचेंज बोनसचा फायदा होऊ शकतो. विवो स्टोअरवरून डिव्हाइस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ६९९ रुपये किमतीचे मोफत विवो एक्सई ७१० इयरफोन्स मिळतील. विवो टी ३ 5G (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे.

iPhone: आयफोनच्या खरेदीवर मिळतेय मोठी सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!

या फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि १८०० न्यूटन्सची प्रभावी पीक ब्राइटनेस सह ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅमसह शक्तिशाली मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० प्रोसेसर आहे.  या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलाचा कॅमेरा मिळत आहे. याशिवाय, ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच बॅटरी, अतिरिक्त सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवांसाठी स्टिरिओ स्पीकर सेटअप देण्यात आले आहे.

प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्ससह पोको सी६१ भारतात लॉन्च!

कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, वायफाय ६, ब्लूटूथ ५.३ आणि जीपीएस चा सपोर्ट देण्यात आला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धा करताना विवो टी ३ 5G चा सामना नथिंग फोन (२ ए) आणि पोको एक्स ६ सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी होणार आहे.

Whats_app_banner