Vivo S19: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ८० वॅट फास्ट चार्जिंग; विवो एस सीरिज बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo S19: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ८० वॅट फास्ट चार्जिंग; विवो एस सीरिज बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत!

Vivo S19: ५० मेगापिक्सल कॅमेरा, ८० वॅट फास्ट चार्जिंग; विवो एस सीरिज बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत!

Jun 02, 2024 08:35 PM IST

Vivo S Series: ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ८० वॅट फास्ट चार्जिंगसह विवो एस सीरिज स्मार्टफोन बाजारात दाखल झाली आहे.

विवो एस सीरिजमध्ये ग्राहकांना कोणती फिचर्स मिळणार आहेत, हे जाणून घेऊ.
विवो एस सीरिजमध्ये ग्राहकांना कोणती फिचर्स मिळणार आहेत, हे जाणून घेऊ. ( Vivo)

Vivo S19 and Vivo S19 Pro Launched: विवो कंपनीने विवो एस १९ आणि विवो एस १९ प्रो हे नवीन फोन चीनमध्ये लॉन्च केले आहेत. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर मिळत आहे. ८० वॅट फास्ट चार्जिंगसह हे स्मार्टफोन अँड्रॉइड १४ बेस्ड ओरिजिनओएस ४ सह सुसज्ज आहेत. डिसेंबर 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या विवो एस 18 लाइनअपनंतर, या मॉडेल्सचे लक्ष्य त्यांच्या पूर्वसुरींना यशस्वी करण्याचे आहे.

किंमत

८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २ हजार ४९९ चीनी युआन (अंदाजे २८, ८०० रुपये) पासून सुरू होते. तर, १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज पर्यायासाठी ३ हजार २९९ चीनी युआन (अंदाजे ३८००० रुपये) आकारले जात आहेत. दरम्यान, विवो एस १९ प्रो ८ जीबी रॅम+ २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३ हजार २९९ चीनी युआन (अंदाजे ३८००० रुपये) पासून सुरू होते. या स्मार्टफोनच्या टॉप मॉडेलची किंमत (१६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३ हजार ९९९ चीनी युआन (अंदाजे ४६ हजार १०० रुपये) इतकी आहे.

या रंगात स्मार्टफोन बाजारात उपलब्ध

हा स्मार्टफोन विवो चायनाई-स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. विवो एस १९ मिस्टी ब्लू, पीच ब्लॉसम फॅन आणि पाइन स्मोक इंक अशा तीन रंगात उपलब्ध आहे. तर, विवो एस १९ प्रो मिस्टी ब्लू, स्वॉर्ड शॅडो ग्रे आणि थाऊजंड ग्रीन माउंटन्स अशा रंगात खरेदी केला जाऊ शकतो.

६.७८ इंचाचा 1.5K ओएलईडी डिस्प्ले

दोन्ही डिव्हाइसेसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा 1.5K ओएलईडी डिस्प्ले मिळतो. बेस मॉडेलसाठी स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसर आणि प्रो व्हर्जनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ९२००+ चिपसेटसह चालणारे हे फोन अँड्रॉइड १४ वर आधारित ओरिजिनओएस ४ आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालतात.

५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा

विवो एस १९ मध्ये ५० मेगापिक्सल ओम्नीव्हिजन ओव्ही ५० ई प्रायमरी सेन्सर आहे. तर, प्रो मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स ९२१ प्रायमरी रियर सेन्सर आणि ८ एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहेत. याव्यतिरिक्त, विवो एस १९ प्रो मध्ये ५० मेगापिक्सल टेलिफोटो शूटर आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये ५० मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहेत.

८० वॅट फास्ट चार्जिंग

८० वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह विवो एस १९ मध्ये ६००० एमएएचची बॅटरी आहे. तर, प्रो व्हेरियंटमध्ये ५,५०० एमएएच बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.४, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी चा समावेश आहे.

Whats_app_banner