Smartphones Best Offers: नव्या वर्षानिमित्त नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. ई-कॉमर्स साइट्सवर विवो, रिअलमी आणि पोको कंपनीच्या स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. तसेच या कंपनीच्या अनेक स्मार्टफोनवर एक्स्जेंज ऑफरदेखील मिळत आहे. अशा स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.
इन्फिनिक्स हॉट ३० 5G स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येते. या फोनमध्ये ६.७८ इंच डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेश रेट मिळत आहे. या फोनवर बँक ऑफरद्वारे १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ११ हजार ४९९ रुपयांना विकला जात आहे. फ्लिपकार्ट एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के सूट मिळत आहे.
फ्लिपकार्टवर विवो टी२ एक्स 5G स्मार्टफोन (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर मिळत आहे. बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना अतिरिक्त ७५० रुपयांची बचत करता येणार आहे.या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा आहे. हे Dimensity 6020 चिपसेटने सुसज्ज आहे.
हा फोन (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) २० हजार ९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आले. ई-कॉमर्स सुरु वेबसाईट हा स्मार्टफोन अवघ्या १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येईल. पोको एक्स ५ 5G मध्ये ६.६७ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तुम्हाला कोणत्याही क्रेडिट कार्डवरून १००० रुपयांची सूट मिळेल.
रिअलमी ११ एक्स 5G फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. बँक ऑफरद्वारे या स्मार्टफोनच्या खरेदीवर १००० रुपयांची अतिरिक्त बचत देखील केली जाऊ शकते. फोनमध्ये ६.७२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे MediaTek Dimensity 6100+ SoC सह सुसज्ज आहे.