Smartphone: चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन हवाय, पण बजेट कमी आहे? मग 'ही' बातमी नक्की वाचा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphone: चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन हवाय, पण बजेट कमी आहे? मग 'ही' बातमी नक्की वाचा

Smartphone: चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन हवाय, पण बजेट कमी आहे? मग 'ही' बातमी नक्की वाचा

Updated Oct 16, 2024 01:17 PM IST

Vivo Y300 Plus launched: विवोने आपला नवीन मिड-रेंज फोन विवो वाय ३०० प्लस भारतात लॉन्च केला आहे. या फोनची खासियत म्हणजे यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो वाय ३०० प्लस भारतात लॉन्च
विवो वाय ३०० प्लस भारतात लॉन्च

Vivo Y300 Plus launched In India: विवोने आणखी एक मिड-रेंज फोन विवो वाय ३०० प्लस भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. स्मार्टफोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले सह स्लीक चेसिस आणि बॅक पॅनेलच्या कोपऱ्यात आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. विवोच्या या फोनची खासियत म्हणजे यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  ३२ मेगापिक्सलचा पॉवरफुल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देखील मिळत आहे. दरम्यान, २५ हजारांच्या आत चांगला कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी विवोचा हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.

१२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या विवो स्मार्टफोनचे ८ जीबी रॅम व्हेरियंट भारतात २३ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याशिवाय, आयसीआयसीआय, एसबीआय आणि एचडीएफसी, क्रेडिट/डेबिट कार्डसह युजर्संना १००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्यानंतर हा फोन तुम्ही २२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन विवो इंडिया ई-स्टोअरद्वारे सिल्क ब्लॅक आणि सिल्क ग्रीन रंगात खरेदी करता येणार आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआयसह तीन आणि सहा महिन्यांत खरेदी करता येईल.

विवो वाय ३०० प्लस 5G: डिस्प्ले

विवो वाय ३०० प्लस मध्ये ६.७८ इंचाचा 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १३०० निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर सह ८ जीबी LPDDR4X रॅम आणि यूएफएस २.२ १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यात १६ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. हा फोन फनटच ओएस १४ वर अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

विवो वाय ३०० प्लस 5G: कॅमेरा

विवो वाय ३०० प्लसमध्ये ५० मेगापिक्सलप्रायमरी शूटर आणि २ मेगापिक्सलडेप्थ शूटरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सर पाहायला मिळतो. 

विवो वाय ३०० प्लस 5G: बॅटरी

फोनमध्ये ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी विवोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Whats_app_banner