Viral Video : लाडक्या गणरायाला निरोप देताना ढसाढसा रडला ९ वर्षाचा मुलगा, पाहा व्हिडिओ-viral video 9 year old cries while offering laddoos to a ganesh idol ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Viral Video : लाडक्या गणरायाला निरोप देताना ढसाढसा रडला ९ वर्षाचा मुलगा, पाहा व्हिडिओ

Viral Video : लाडक्या गणरायाला निरोप देताना ढसाढसा रडला ९ वर्षाचा मुलगा, पाहा व्हिडिओ

Sep 11, 2024 05:20 PM IST

Ganeshotsav 2024: गणपती विसर्जनादरम्यान आपल्या लाडक्या बाप्पाला लाडू अर्पण करताना चिमुकला ढसाढसा रडला.

लाडक्या गणरायाला निरोप देताना ढसाढसा रडला ९ वर्षाचा मुलगा
लाडक्या गणरायाला निरोप देताना ढसाढसा रडला ९ वर्षाचा मुलगा (Screengrab from Instagram/abhinavaroraofficial)

Viral News: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून १८ सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. आज पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक लहान मुलगा लाडक्या बाप्पाला निरोप देताना ढसाढसा रडत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

गणेश विसर्जन २०२३ दरम्यान केशरी कपडे परिधान करून नदीजवळ बसलेला हा मुलगा रडत आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत आहे. मूर्ती विसर्जनासाठी नेण्यासाठी पुजारीजवळ येताच मुलगा अधिकच भावूक झाला. इन्स्टाग्राम, एक्स  आणि फेसबुकसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप वेगाने पसरली. अभिनव अरोरा (वय, ९) असे या मुलाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे.

अभिनवने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'गेल्या वर्षीचा तो दिवस आजही आठवतो, जेव्हा गणपती बाप्पा जात होते. माझ्या मनात एकच आशा होती की, बाप्पा लवकर येतील…आणि आपले वचन पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा येत आहेत.' या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर २४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

भारतातील सर्वात तरुण आध्यात्मिक वक्ता

अभिनवचे इन्स्टाग्राम ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो नियमितपणे हिंदू उत्सव, धर्मग्रंथ आणि आध्यात्मिक नेत्यांशी झालेल्या भेटींबद्दल पोस्ट करतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना भारतातील सर्वात तरुण आध्यात्मिक वक्ता म्हणून हा पुरस्कार प्रदान केला आहे.

अभिनव कोण आहे?

अभिनव हा उद्योगपती, लेखक आणि टीईडीएक्स स्पीकर तरुण राज अरोरा यांचा मुलगा आहे. तरुण आपल्या मुलाचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळतो. त्यांचे काही चाहते त्याला प्रेमाने ‘बाल संत’ म्हणून ओळखतात. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनव स्वत:ला बलराम समजतो आणि भगवान श्रीकृष्णाला आपला धाकटा भाऊ मानतो.

असा असतो अभिनव दिनक्रम

याआधीच्या मुलाखतींमध्ये अभिनवने सांगितले होते की, त्याचा दिनक्रम पहाटे ३.३० वाजता सुरू होईल. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी तो उठतो आणि माला जप या प्रार्थनेत गुंततो. पहाटे ४ वाजता तो घरी प्रार्थना विधी करतात. त्यानंतर ६.३० वाजता तुळशीची पूजा करतात.  या दरम्यान ते बाल गोपाल देवतेला नैवेद्य देखील अर्पण करतात.

Whats_app_banner
विभाग