भारतीय वंशाच्या टेक बॉसच्या पगाराचा आकडा सोशल मिडियावर व्हायरल! रोज ४८ कोटींची कमाई, वार्षिक आकडा ऐकून डोळे होईल पांढरे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  भारतीय वंशाच्या टेक बॉसच्या पगाराचा आकडा सोशल मिडियावर व्हायरल! रोज ४८ कोटींची कमाई, वार्षिक आकडा ऐकून डोळे होईल पांढरे

भारतीय वंशाच्या टेक बॉसच्या पगाराचा आकडा सोशल मिडियावर व्हायरल! रोज ४८ कोटींची कमाई, वार्षिक आकडा ऐकून डोळे होईल पांढरे

Jan 06, 2025 06:20 AM IST

viral news : भारतीय वंशाच्या एका टेक बॉसचा पगार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. जगदीप सिंह असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा वार्षिक पगार १७,५०० कोटी रुपये आहे.

भारतीय वंशाच्या टेक बॉसच्या पगाराचा आकडा सोशल मिडियावर व्हायरल! रोज ४८ कोटींची कमाई, वार्षिक आकडा ऐकून डोळे होईल पांढरे
भारतीय वंशाच्या टेक बॉसच्या पगाराचा आकडा सोशल मिडियावर व्हायरल! रोज ४८ कोटींची कमाई, वार्षिक आकडा ऐकून डोळे होईल पांढरे

Who is Jagdeep Singh : भारतीय वंशाच्या एका टेक बॉसचा पगार सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. जगदीप सिंह असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा वार्षिक पगार ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. जगदीप सिंह हे दरवर्षाला तब्बल १७,५०० कोटी रुपयांची कमाई करतात. जगदीप सिंग हे क्वांटम स्केपचे संस्थापक असून त्यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहने बनवते. जगदीप यांचा एक दिवसाचा पगार ४८ कोटी रुपये आहे. ही रक्कम सर्व मोठ्या कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न असू शकते. त्यांच्या वेतन पॅकेजमध्ये शेअर्सचाही समावेश आहे, ज्याचे मूल्य २.३ अब्ज डॉलर्स इतके आहे.

जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी बर्कले विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. एचपी आणि सन मायक्रोसिस्टिम्समधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये काम केले. त्यापैकीच एक म्हणजे १९९२ मध्ये सुरू झालेली एअरसॉफ्ट. दहा वर्षांहून अधिक काळ विविध कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर जगदीप सिंग यांनी २०१० मध्ये क्वांटमस्केप या कंपनीची सुरुवात केली. ही कंपनी बॅटरी तंत्रज्ञानात नावीन्य पूर्ण काम करत आहे.

क्वांटमस्केप इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करत आहे. या बॅटरी पारंपारिक लिथियम-आयन बॅटरीपेक्षा वेगळ्या राहणार आहेत. कारण, त्या लिक्विड इलेक्ट्रोलाइट्स वापरणार नाहीत. त्यामुळे या बॅटरी अधिक सुरक्षित मानल्या जातात. तसेच वेगाने चार्ज करण्याची क्षमता देखील या बॅटरीमध्ये आहे. क्वांटमस्केपला बिल गेट्स आणि फोक्सवॅगन सारख्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे.

जगदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वांटमस्केप ईव्ही बॅटरी तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहेत. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी जगदीप सिंह यांनी कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद शिवा शिवरामन यांच्याकडे आहे. जगदीप आता क्वांटमस्टेपच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तो स्टेल्थ स्टार्टअपचे सीईओ देखील आहेत.

 

Whats_app_banner