Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक बेवडा रस्त्यानं चालला होता आणि अचानक पाय घसरून चिखलात पडला.
त्याच क्षणी वीज चमकली…
बेवडा म्हणाला, का माझ्या मागे लागलास देवा, आधी चिखलात पाडलंस आणि वर फोटो काढतोस
…
भाषांतरामुळं बंड्या इंग्रजी विषयात नापास झाला!
बंड्यानं असं काय लिहिलं होतं, तुम्हीच वाचा!
१. मी एक आम आदमी आहे.
I AM A MANGO MAN.
२. मला इंग्रजी येते
ENGLISH COMES TO ME.
३. मी हरिपूर हजारा गावात राहतो
I BELONG TO HARIPUR THOUSANDA
४. रस्त्यावर गोळीबार सुरू आहे
TABLETS ARE WALKING ON THE ROAD
…
संता त्याच्या मुलासाठी एका घरी मुलगी बघायला गेला…
मुलीचे आई-वडील म्हणाले, आमची मुलगी सध्या शिकते आहे.
संता म्हणाला, काही हरकत नाही. तिचा क्लास संपल्यानंतर येतो तासाभराने.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)