Vinod Adani : विनोद अदानींचा आॅस्ट्रेलियाच्या कोळसा खाणीशी निगडित ३ कंपन्यांचा राजीनामा
Vinod Adani : गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानींनी आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीशी निगडित तीन कंपन्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात कारमाईकल रेल अँड पोर्ट सिंगापूर, कारमाईकल रेल सिंगापूर आणि एबाॅट प्वाईट टर्मिनल एक्सपेंशन कंपन्यांतून राजीनामा दिला आहे.
Vinod Adani : गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानींनी आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीशी निगडित तीन कंपन्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात कारमाईकल रेल अँड पोर्ट सिंगापूर, कारमाईकल रेल सिंगापूर आणि एबाॅट प्वाईट टर्मिनल एक्सपेंशन कंपन्यांतून राजीनामा दिला आहे. अदानी समूहाने या राजीनाम्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. विनोद यांनीही इमेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
फेब्रुवारीच्या अखेरीस अदानी समूहावर प्रश्नचिन्हांची मालिका सुरु झाली होती. तेंव्हा शेअर्समध्ये घरसऱण मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर काही दिवसातच विनोद अदानींनी या कंपन्यांच्या पदांचा राजीनामा दिला. या कंपन्यांवर त्यांनी अब्जावधी रुपये लावले होते. दरम्यान विनोद अदानी अजूनही अबाॅटच्या संचालक पदावर कायम आहेत.
यादरम्यान, अदानी ग्रुप आणि विनोद यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहारांसंदर्भात सेबी चौकशी करत आहे. हिडेनबर्गच्या अहवालातही अदानी ग्रुपच्या शेअर्सचे वाढवण्यासाठी विनोद अदानींच्या अखत्यारितील कंपन्यांनी अदानी समूहात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
विनोद अदानींकडे अदानी ग्लोबलच्या दुबई कार्यालयात एक केबिन आहे. या ठिकाणी ते दिवसाचे दोन ते तीन तास व्यतित करतात, असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.
संबंधित बातम्या