Success Story: तरुणांना वाटते की, मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. मात्र फणींद्र सामा याची कहाणी वाचून एक गोष्ट समजेल की, मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी मोठ्या साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर फणींद्रने नोकरीचा शोध सुरू केला मात्र त्यांची इच्छा स्वत:चा उद्योग सुरू करण्याची होती. मात्र त्यांच्याकडे मोठे भांडवल नव्हते. मात्र आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती ठासून भरली होती. फणींद्रने आपले कॉलेजचे मित्र सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्यासोबत मिळून ५ लाखाचे भांडवल उभे केले व उद्योगाचा श्रीगणेशा केला. हा प्रवास सोपा नव्हता, मात्र जबर इच्छाशक्ती व मजबूत टीमवर्कच्या बळावर हे त्यांनी सहजसाध्य केले.
फणींद्र सामा हे तेलंगाणा राज्यातील निजामाबादचे रहिवासी आहेत. तसेच ते जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बस टिकटिंग कंपनी रेडबस, सबसेक आणि निजामाबाद येथील काकतीय सैंडबॉक्सचे संस्थापक आहेत. सध्या ते तेलंगाना सरकारमध्ये मुख्य नवाचार अधिकारी म्हणून कार्यपत आहेत व भारतातील सर्वात मोठे हार्डवेअर प्रोटोटाइपिंग केंद्र टी-वर्क्सच्या बोर्डात आहेत.
रेडबसचा विचार फणींद्र सामा यांच्या वैयक्तिक अनुभवातून आला. सणासुदीच्या काळात घरी जाताना बसचे तिकीट बुकिंग करताना आलेल्या समस्येवर उपाय शोधताना त्यांना ही कल्पना सुचली. त्यांना समजले की, तिकीट बुकिंगची समस्या लाखो लोकांची आहे. त्यांनी ही प्रक्रिया ऑनलाइन आणि सुलभ करण्याचा विचार आपल्या मित्रांसोबत शेअर केला. २००६ मध्ये तिघांनी मिळून रेडबसची सुरुवात केली. सुरुवातीलाच रेडबस लोकप्रिय झाले व लोक एका क्लिकवर बसची तिकीटे बुक करू लागले.
रेडबसने बस तिकीट बुकिंग प्रक्रियाच बदलून टाकली. जेथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागत होते, तेथे रेडबसने ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्याने चुटकीसरशी तिकीटे बुकिंग होऊ लागली. या सोप्य पद्धतीने रेडबस भारतात गतीने लोकप्रिय झाली. २००७ मध्ये याला पहिल्यांदा फंडिंग मिळाले व कंपनीचा विस्तार झाला. २०१३ मध्ये इबिबो ग्रुपने रेडबसला ८२८ कोटींमध्ये अधिग्रहित केले. ही डील भारतीय स्टार्टअप्ससाठी प्रेरणा बनली. त्यानंतरही फणींद्र सामा यांनी कंपनीच्या विस्तारात मोलाचे योगदान देत याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
फणींद्र सामा यांची यशोगाथा हे दर्शवते की, मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी भांडवल व संसाधनाहून गरजेचे आहे योग्य दृष्टिकोण आणि मेहनत. रेडबसचे यश भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमच्या विकासाचे प्रतीक बनले आहे. यामुळे हे सिद्ध झाले आहे की, इच्छाशक्ती, योग्य रणनिती आणि टीमवर्कने कोणतेही आव्हान पार केले जाऊ शकते. फणींद्र सामा यांनी कहाणी अशा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे छोट्या भांडवलात मोठी स्वप्ने साकार करण्याची इच्छा ठेवतात.
संबंधित बातम्या