Vijay Sales: विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात, आयफोनसह अनेक उत्पादनांवर भरघोस सूट-vijay sales starts mega freedom sale deals on iphone 15 plus oneplus 12 and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vijay Sales: विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात, आयफोनसह अनेक उत्पादनांवर भरघोस सूट

Vijay Sales: विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात, आयफोनसह अनेक उत्पादनांवर भरघोस सूट

Aug 13, 2024 06:03 PM IST

Vijay Sales Mega Freedom Sale: विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात झाली असून या सेलअंतर्गत ग्राहकांना अनेक वस्तू स्वस्तात खरेदी संधी उपलब्द झाली आहे.

विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात
विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'ला सुरुवात

Vijay Sales Sale: रिटेल चेन कंपनी विजय सेल्सने मेगा फ्रीडम सेल घोषणा केली. हा सेल येत्या १८ ऑगस्‍ट २०२४ पर्यंत सुरू राहणार असून या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्‍ट्रॉनिक्‍ससह अनेक वस्तुंच्या खरेदीवर ७० टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. ग्राहक विजय सेल्सचे १४० हून अधिक रिटेल आऊटलेट्स किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून वस्तूंची खरेदी करू शकतात.

विजय सेल्‍सच्या 'मेगा फ्रीडम सेल'मध्ये ग्राहकांना स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, स्‍मार्टवॉचेस्, टेलिव्हिजन्‍स, वेअरेबल ऑडिओ डिवाईसेस, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्स, किचन अप्‍लायन्‍सेस अशा वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सेलअंतर्गत आयफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ग्राहक आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस स्वस्तात खरेदी करू शकतात, ज्यांची किंमत अनुक्रमे ६५ हजार ६९० हजार आणि ७३ हजार १९० रुपये आहे. आयसीआयसीआय व एसबीआय बँक धारकांना अतिरिक्त सूट मिळत आहे.

वॉशिंन मशीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

वॉशिंन मशीन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या सेलमध्ये ग्राहकांना एलजी कंपनीची टॉप लोड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग आणि फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनच्या खरेदीवर पैसे वाचवता येणार आहेत. याशिवाय, स्मार्ट टीव्हीवरही खास ऑफर सुरू आहे. विजय सेल्स निर्मित वाइज ८० सेमी स्‍मार्ट क्‍यूएलईडी टेलिव्हिजन फक्त १५ हजार ९९० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. याचबरोबर किचन अप्‍लायन्‍सेसवरही भरघोस सूट मिळत आहे.

स्मार्टफोनवर सूट

टॉप स्‍मार्टफोन ब्रँड्सवर ग्राहकांना अविश्‍वसनीय डील्‍स मिळत आहे. ६,४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या टॉप स्‍मार्टफोन ब्रँड्सवर ग्राहकांना सूट मिळत आहे, ज्यात रेडमी १३ सिरीज, सीएमएफ बाय नथिंग फोन १, वनप्‍लस १२, ओप्‍पो एफ२७ प्रो+ हे मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत.

इतर प्रॉडक्टवर भरघोस सूट

मायक्रोवेव्‍ह्ज, एअर फ्रायर्स, रेफ्रिजरेटर्स, इन्‍व्‍हर्टर एसीं यांसारख्‍या कूकिंग आवश्‍यक वस्तुंचा या सेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. विजय सेल्‍ससह खरेदी करण्‍याचा आणखी एक फायदा म्‍हणजे मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम, जो ग्राहकांना त्‍यांचे स्‍टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइट विजयसेल्स डॉटकॉमवरील खरेदीवर ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. मिळालेल्‍या प्रत्‍येक पॉइण्‍टची किंमत रिडिम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपया आहे.

विभाग