मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vijay Sales: विजय सेल्‍सचा मेगा रिपब्लिक डे सेल; आयफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट

Vijay Sales: विजय सेल्‍सचा मेगा रिपब्लिक डे सेल; आयफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2024 06:24 PM IST

Vijay Sales Republic Day Sale: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वतात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Vijay Sales
Vijay Sales

Vijay Sales Offers on iPhone and Electronic Items: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रिटेल चेन कंपनी विजय सेल्‍स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयफोन, नवीन गॅझेट्स, होम अप्‍लायन्‍सेस अशा विविध डिव्हाईसेसवर भरघोस सूट देत आहे. विजय सेल्समध्ये सुरु असलेल्या सेल अंतर्गत ग्राहकांना पैशांची बचत करता येणार आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक विजय सेल्सच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात किंवा जवळच्या स्टोअरमध्ये जाऊन वस्तूंची खरेदी करू शकतात.

विजय सेल्‍सच्‍या मेगा डिल्‍ससह ग्राहक आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. ग्राहकांना आयफोन १३, आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रो मॅक्स मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करता येऊ शकतो. विजय सेल्समध्ये आयफोन १३ हा ५२ हजार ४०० रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रो मॅक्स अनुक्रमे ६८ हजार ९०० रुपये आणि १ लाख ४९ हजार ४०० रुपयांत खरेदी करता येऊ शकते. आयफोनच्या खरेदीवर ग्राहकांना त्वरीत बँक डिस्काऊंट मिळत आहे.

या सेलमध्ये ६,३९९ रूपयांपासून स्मार्टफोन, ८,९९० रूपयांपासून टीव्ही, १५,९९० रूपयांपासून लॅपटॉप, ६९९ रूपयांपासून ट्रूली वायरलेस इअरबड्स आणि ८९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या स्‍मार्टवॉच खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय, केबल, चार्जर्स, पेनड्राइव्‍ह्ज इत्‍यादी सारख्‍या इलेक्‍ट्रॉनिक अ‍ॅक्‍सेसरीजसह एसी, किचन अप्‍लायन्‍सेस, वॉशिंग मशिन्‍स, इस्‍त्री व गारमेंट स्‍टीमर्स, मायकोवेव्‍ह्ज अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत आहे.

विजय सेल्सच्या अधिकृत वेबसाईटद्वारे रेडमी नोट १३ सिरीज, विवो एक्‍स १०० सिरीज, ओप्‍पो रेनो ११ प्रो आणि बोस क्‍वाइटकम्‍फर्ट अल्‍ट्रा वायरलेस हेडफोन्‍स उपलब्‍ध आहेत. याव्‍यतिरिक्‍त, ग्राहक नुकतेच लाँच करण्‍यात आलेला सॅमसंग गॅलॅक्‍सी एस २४ सिरीज स्‍मार्टफोन २००० रूपयांच्‍या किमान किमतीमध्‍ये प्री-बुक करू शकतात.

Amazon Republic Day Sale: भल्यामोठ्या टीव्हीवर ६४ टक्के सूट; अगदी स्वस्तात आणा घरी

 

कोणत्या बँक खातेदारांना किती डिस्काऊंट मिळणार?

 

 एचएसबीसी बँक ग्राहक २०,००० रूपयांवरील क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ५००० रूपये सूट मिळवू शकतात.

- येस बँक ग्राहक १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,५०० रूपये सूट मिळवू शकतात.

- आरबीएल बँक ग्राहक १५,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ३,५०० रूपये सूट मिळवू शकतात.

- वन कार्डधारक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह ७,५०० रूपये सूट मिळवू शकतात आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १,००० रूपयांची सूट मिळवू शकतात.

- अ‍ॅमेक्‍स क्रेडिट कार्डधारक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह ६,००० रूपये सूट मिळवू शकतात आणि ३०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ५,००० रूपयांची सूट मिळवू शकतात.

- एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक कार्डधारक त्‍यांच्‍या डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,००० रूपयांची सूट मिळवू शकतात आणि फक्‍त रविवारी १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन- ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १००० रूपयांची सूट मिळवू शकतात.

- डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक फक्‍त स्‍टोअर्समध्‍ये १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,५०० रूपये सूट मिळवू शकतात. फेडरल बँक क्रेडिट कार्डधारक ईएमआयवर आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ५,००० रूपये सूट मिळवू शकतात.

WhatsApp channel

विभाग