बीकेसीत भरलंय मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन; पाहा, वापरून बघा आणि खरेदी करा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बीकेसीत भरलंय मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन; पाहा, वापरून बघा आणि खरेदी करा!

बीकेसीत भरलंय मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन; पाहा, वापरून बघा आणि खरेदी करा!

Dec 26, 2024 05:28 PM IST

Mumbai BKC Electronics Exhibition News : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर विजय सेल्सच्या पुढाकारानं मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

बीकेसीत भरलंय मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन; पाहा, वापरून बघा आणि खरेदी करा!
बीकेसीत भरलंय मुंबईतील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन; पाहा, वापरून बघा आणि खरेदी करा!

Electronics Exhibition in BKC : ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची भारतातील आघाडीची रिटेल चेन कंपनी विजय सेल्सनं आयआयसीएफ कन्झ्युमर एक्स्पोशी संयुक्त सहकार्यानं मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन भरवलं आहे. तब्बल ६०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या इलेक्ट्रॉनिक शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये टेक चाहत्यांना तब्बल १०० ब्रँड्सची उत्पादनं पाहण्याची व खरेदीची संधी आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन ६ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

टेक्नॉलॉजीची आवड असलेल्यांना हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात अ‍ॅपल, सॅमसंग, एलजी, सोनी, वनप्लस, बोट, हेयर, व्हर्लपूल, अ‍ॅसस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉरफी रिचर्ड्स, फिलिप्स, वंडरशेफ, एओ स्मिथ आणि इतर अनेक आघाडीच्या ब्रँड्सची नवी उत्पादनं आहेत.

प्रत्येक ब्रँडचा एक्सपिरियन्स झोन

अगदी अलीकडं लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सपासून ते स्मार्ट किचन उपकरणं आणि प्रीमियम होम अ‍ॅप्लायन्सेसपर्यंत, सगळ्यांना आकर्षित करणारं असं काहीतरी या प्रदर्शनात आहे. इथं प्रत्येक मोठ्या ब्रँडचा स्वतःचा एक एक्सपिरीयन्स झोन आहे. उत्पादनं प्रत्यक्ष बघून उत्तम सौदा करण्यासाठी खरेदीदारांना मिळालेली ही उत्तम संधी आहे.

प्रदर्शनातील खरेदीवर आकर्षक सवलती

विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी मुंबईत होत असलेल्या या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. 'इंडिया इंटरनॅशनल कन्झ्युमर फेअरशी भागीदारी करून आम्ही ग्राहकांना अतुलनीय किंमतीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजी-उत्पादनं प्रत्यक्ष बघून किफायतशीर दरात देत आहोत. या उत्पादनांवर आकर्षक सवलती आहेत. त्यामुळं स्वतःसाठी किंवा प्रियजनांसाठी खरेदी करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन व सरस ब्रॅंड्सची उत्पादनं खरेदी करून नव्या वर्षाचा आनंद द्विगुणित करावा, असं आवाहन गुप्ता यांनी केलं आहे.

बँकांकडून इन्स्टंट डिस्काउंट

एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारक २०,००० रुपयांच्या वरील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ४५०० रुपयांपर्यंत ७.५% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

येस बँकेचे ग्राहक १०,००० रु. च्या वरील क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर २५०० रु. पर्यंत ५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.

आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारक १५,००० रु. वरील ईएमआय व्यवहारांवर ४५०० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.

बँक ऑफ बरोडाचे ग्राहक १५,००० रुपयांवरील बॉबकार्ड ईएमआय व्यवहारांवर १५०० रुपयांपर्यंत ७.५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.

अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड धारक २५,००० ते ४९,९९९ रुपयांच्या खरेदीपर्यंत ईएमआय व्यवहारांवर फ्लॅट ७.५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, तर ५०,००० रु. आणि त्यापेक्षा जास्त खरेदीसाठीच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयापर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

एयू स्मॉल फायनॅन्स बँक क्रेडिट कार्ड धारक फक्त रविवारच्या दिवशी १०,००० रुपयांवरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर १००० रुपयांपर्यंत ५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

डीबीएस बँक क्रेडिट कार्ड धारक त्यांच्या ईएमआय व्यवहारांवर ३००० रुपयांपर्यंत आणि १५,००० रुपयांच्या वरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड धारक ५०,००० रुपये आणि त्यावरील ईएमआय व्यवहारांवर १०,००० रुपयांपर्यंत ५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

पीएनबी बँक क्रेडिट कार्ड धारक १५,००० रुपये आणि त्यावरील ईएमआय व्यवहारांवर ५००० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. 

फेडरल बँक क्रेडिट कार्ड धारक २०,००० रुपये आणि त्यावरील ईएमआय व्यवाहरांवर ३५०० रुपयांपर्यंत आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर ३००० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, तर डेबिट कार्ड धारक २०,००० रुपये आणि त्यावरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर २५०० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.

Whats_app_banner