Videocon loan fraud case : वेणूगोपाल धूत यांनाही जामीन मिळणार का ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Videocon loan fraud case : वेणूगोपाल धूत यांनाही जामीन मिळणार का ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Videocon loan fraud case : वेणूगोपाल धूत यांनाही जामीन मिळणार का ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Published Jan 20, 2023 10:35 AM IST

Videocon loan fraud case : व्हिडिओकाॅन कर्ज फसववणूक प्रकरणात अंतरिम जामीन मागणाऱ्या व्हिडिओकाॅन समुहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Videocon CEO Venugopal Dhoot
Videocon CEO Venugopal Dhoot (HT)

Videocon loan fraud case : व्हिडिओकाॅन कर्ज फसववणूक प्रकरणात अंतरिम जामीन मागणाऱ्या व्हिडिओकाॅन समुहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

१३ जानेवारी रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी के चव्हाण यांच्या खंडपीठाने मागितलेल्या अंतरिम दिलासाबाबत आदेश देऊन प्रकरण बंद केले होते.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना जामीन मिळाल्यानंतर वेणूगोपाल धूत यांनीही अंतरिम जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सीबीआयने केलेली ही अटक प्रासंगिक आणि यांत्रिक पद्धतीने केल्याची टीका उच्च न्यायालयाने केली आहे.

धूत यांचे वकील संदीप लड्ढा यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता की, धूत तपासात सहकार्य करत असल्याने त्यांची अटक अवाजवी आहे. मात्र, वेणूगोपाल धूत तपासात टाळाटाळ करत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता.

सीबीआयने २६ डिसेंबर २०२२ रोजी धूतला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी के चव्हाण यांच्या खंडपीठाने धूत यांचे वकील संदीप लड्ढा आणि सीबीआयचे वकील राजा ठाकरे या दोघांची सुनावणी घेतल्यानंतर अंतरिम दिलासाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

धूत यांनी आपल्या अटकेबाबत सादर केलेल्या याचिकेत, सीबीआयने आपली अटक "मनमानी, बेकायदेशीर, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१ (ए) चे उल्लंघन आहे. या अटकेसाठी सीबीआयने कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.

Whats_app_banner