मराठी बातम्या  /  बिझनेस  /  व्होडाफोनच्या 'या' प्लानसमोर जिओ- एअरटेल फेल; अवघ्या १५१ रुपयांत हॉट स्टॉर सब्सक्रिप्शनसह बरंच काही!

व्होडाफोनच्या 'या' प्लानसमोर जिओ- एअरटेल फेल; अवघ्या १५१ रुपयांत हॉट स्टॉर सब्सक्रिप्शनसह बरंच काही!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 19, 2024 12:18 PM IST

vi recharge 151 plan: व्होडाफोन आयडियाच्या १५१ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टारचे दिले जात आहे.

vodafone idea HT
vodafone idea HT

Vodafone Idea Prepaid Plan: कमी किंमतीत डेटा आणि डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल, असा प्लानच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कारण, दूरसंचार कंपनी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक भन्नाट प्लान आणला आहे, ज्यात डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह भरघोस डेटा मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा प्लान स्पर्धक कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपन्यापेक्षा खूपच कमी पैशात येतो. याशिवाय, ग्राहकांना या प्लानमध्ये इतर अनेक फायदे मिळत आहेत.

व्होडाफोनचा १५१ रुपयांचा प्लान

व्होडाफोनच्या १५१ रुपयांच्या प्लानमध्ये ८ जीबी डेटा आणि तीन महिन्यांसाठी डिज्नी हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लॉन ३० दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. हा डेटा अॅड ऑन प्लान आहे. महत्त्वाचे म्हणजे, रिलायन्स जिओ डिज्नी हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनसाठी ३२८ रुपयांचा प्लॉन ऑफर करतो. तर, एअरटेल आपल्या ग्राहकांना ८६९ रुपयांमध्ये डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शन देते.

 

जिओचा ३२८ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला २८ दिवसांची वॅलिडिटी मिळते. डिस्ने+ हॉटस्टारसह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन ३२८ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा आणि 3 महिन्यांसाठीडिस्ने+ हॉटस्टारचे मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते.

 

एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा प्लान ८४ दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच दररोज १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील देण्यात आला. या प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी दिले जाते.

WhatsApp channel