Vi Nonstop Hero Truly Unlimited Data Plans Launched: व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआयने आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा मोठी भेट दिली आहे. व्हीआयने दरवाढ न करता प्रीपेड प्लॅनसोबत डेटा बेनिफिट वाढवला आहे. व्हीआयने आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा असलेला सुपरहिरो प्लान लॉन्च केला. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळत आहे. व्होडाफोन आयडियाने लॉन्च केलेला ट्रूली अनलिमिटेड डेटा प्लान भारताचा खऱ्या अर्थाने अनलिमिटेड प्लान असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २४ तास अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे.
बाजारात अनेक कंपनींची प्रीपेड प्लान आहेत, ज्यात ग्राहकांना ठराविक डेटा मिळतो. त्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त डेटा प्लान रिचार्ज करावा लागतो. या गोष्टी लक्षात घेऊन व्हीआयने आपल्या ग्राहकांसाठी नॉनस्टॉप हिरो प्लान लॉन्च केला आहे. या प्लान अतंर्गत ग्राहकांना अनलिमिटेड डेटा उपलब्ध करून देणे, असा कंपनीचा उद्देश आहे. व्हीआयने लॉन्च केलेले नॉनस्टॉप हिरो प्लान फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील नागरिकांसाठी आहे.
व्हीआयचा ३६५ रुपयांचा हिरो अनलिमिटेड डेटा प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मिळतात. तर, ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, दररोज कॉल आणि १०० एसएमएस मिळतात, या प्लानची मर्यादा एक महिन्याची आहे. याशिवाय, या प्लानमध्ये व्हीआय मूव्हीज आणि टीव्ही सब्सक्रिप्शन देखील मिळते. तर, ७९५ (५६ दिवस) आणि ९७९ (८४ दिवस) रुपयांचा प्लानमध्येही ग्राहकांना अनलिमिटेड डेटा कॉल आणि १०० एसएएस व्हीआय मूव्हीज अँड टीव्ही सब्सक्रिप्शन मिळते. तर, ९९४ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड टेडा, कॉल्स आणि १०० एसएमसएस आणि तीन महिन्यासाठी डिस्ने + हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे.
संबंधित बातम्या