टेलिकॉम कंपन्यांमध्ये युद्ध पेटणार! Vi देणार जिओ, एअरटेलपेक्षा स्वस्त 5G सेवा, ग्राहकांची चंगळ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  टेलिकॉम कंपन्यांमध्ये युद्ध पेटणार! Vi देणार जिओ, एअरटेलपेक्षा स्वस्त 5G सेवा, ग्राहकांची चंगळ

टेलिकॉम कंपन्यांमध्ये युद्ध पेटणार! Vi देणार जिओ, एअरटेलपेक्षा स्वस्त 5G सेवा, ग्राहकांची चंगळ

Jan 02, 2025 06:06 PM IST

Vodafone Idea 5g Launch Plans : व्होडाफोन आयडिया येत्या मार्च महिन्यात ५जी मोबाइल सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. जिओ आणि एअरटेल या स्पर्धक कंपन्यांपेक्षा १५ टक्के स्वस्त प्लान ग्राहकांना देण्याचा कंपनीचा विचार आहे.

टेलिकॉम कंपन्यांमध्ये युद्ध पेटणार! Vi देणार जिओ, एअरटेलपेक्षा स्वस्त 5G सेवा, ग्राहकांची चंगळ
टेलिकॉम कंपन्यांमध्ये युद्ध पेटणार! Vi देणार जिओ, एअरटेलपेक्षा स्वस्त 5G सेवा, ग्राहकांची चंगळ

Vi 5G Rollout : टेलिकॉम क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी व्होडाफोन आयडिया येत्या मार्च महिन्यात आपली ५जी मोबाइल ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला आव्हान देण्यासाठी स्वस्त प्लान सादर करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यामुळं टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढणार असून ग्राहकांची चंगळ होणार आहे.

टेलिकॉम कंपनीचे ५जी प्लॅन स्पर्धकांच्या कंपन्यांच्या तुलनेत अंदाजे १५ टक्के स्वस्त असण्याची शक्यता आहे. स्पर्धक कंपन्यांकडं आधीपासूनच विस्तृत असं ५जी नेटवर्क आहे.

व्हीआयला २४,००० कोटी रुपयांचा इक्विटी फंडिंग मिळाले असून अतिरिक्त २५,००० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. बँक गॅरंटीची अट माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं निधी संकलनाच्या या प्रयत्नांना बळ मिळालं आहे. या जोरावर कंपनीला नेटवर्क विस्तारासाठी ताकद मिळाली आहे.

काय आहे व्हीआयची योजना?

मिळालेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडिया आपल्या १७ प्राधान्य टेलिकॉम सर्कलमधील ७५ प्रमुख शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. या माध्यमातून अधिकाधिक डेटा वापरणाऱ्या औद्योगिक केंद्रांना लक्ष्य केलं जाणार आहे. मोठ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वितरण खर्च कमी करण्याबरोबरच डीलर्सचं कमिशन वाढविण्याचे मार्ग कंपनी शोधत आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील एका वरिष्ठ विश्लेषकानं इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, ‘व्हीआय आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून मोठ्या ५जी प्रीपेड वापरकर्त्यांना खेचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी डीलर्सचं कमिशन आणि जाहिरात खर्चात वाढीची कंपनीची योजना आहे.’

२०२३-२४ मध्ये व्हीआयनं किती दिलं डीलर कमिशन?

वितरण खर्चावर व्हीआयनं केंद्रीत केलेलं लक्ष त्याच्या अलीकडील आर्थिक ट्रेंडशी सुसंगत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीनं डीलर कमिशनवर ३,५८३ कोटी रुपये म्हणजेच विक्रीच्या ८.४ टक्के इतके खर्च केले आहेत. हा आकडा जिओच्या ३,००० कोटी रुपयांच्या खर्चापेक्षा (विक्रीच्या ३ टक्के) आणि एअरटेलच्या ६,००० कोटी रुपयांच्या खर्चापेक्षा (विक्रीच्या ४ टक्के) लक्षणीय आहे.

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सध्या ५जी मार्केटमध्ये वर्चस्व राखून आहेत आणि सप्टेंबर २०२३ पर्यंत या कंपन्यांचे अनुक्रमे १४८ दशलक्ष आणि १०५ दशलक्ष युजर्स आहेत. नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत ५जी उपकरणांसाठी नुकत्याच झालेल्या ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराच्या जोरावर व्होडाफोन आयडिया ही तफावत भरून काढण्याच्या तयारीत आहे.

व्हीआयनं पुढील तीन वर्षांत ७५ हजार ५जी साइट्स स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. सातत्यानं विस्तारत जाणाऱ्या ५ जी मार्केटमध्ये आपला ठसा उमटवण्याचा कंपनीचा निर्धार यातून दिसून येत आहे.

Whats_app_banner