Explained : व्हिडिओकॉन टीव्हीमुळं घराघरात पोहोचलेले वेणूगोपाल धूत सीबीआयच्या जाळ्यात कसे अडकले?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explained : व्हिडिओकॉन टीव्हीमुळं घराघरात पोहोचलेले वेणूगोपाल धूत सीबीआयच्या जाळ्यात कसे अडकले?

Explained : व्हिडिओकॉन टीव्हीमुळं घराघरात पोहोचलेले वेणूगोपाल धूत सीबीआयच्या जाळ्यात कसे अडकले?

Updated Dec 27, 2022 03:14 PM IST

Venugopal Dhoot : बजाज स्कूटर्सची डिलरशीपच्या मालकीच्या कुटूंबातील, वेणूगोपाल धूत यांनी काही दशकांमध्येच त्यांची कंपनी व्हिडिओकाॅन इलेक्ट्राॅनिक्सला ग्राहक उत्पादन श्रेणीत नेले. पण गेली काही वर्षे त्यांच्यापाठी आर्थिक अडचणींत वाढ होत गेली आहे.

Videocon CEO Venugopal Dhoot Arrested by CBI
Videocon CEO Venugopal Dhoot Arrested by CBI (HT)

Venugopal Dhoot : बजाज स्कूटर्सची डिलरशीपच्या मालकीच्या कुटूंबातील, वेणूगोपाल धूत यांनी काही दशकांमध्येच त्यांची कंपनी व्हिडिओकाॅन इलेक्ट्राॅनिक्सला ग्राहक उत्पादन श्रेणीत नेले. पण गेली काही वर्षे त्यांच्यापाठी आर्थिक अडचणींत वाढ होत गेली आहे. आयसीआयसीआय बॅकेकडून घेतलेल्या थकित कर्ज प्रकरणामुळे त्यात आणखीनच वाढ झाली. या प्रकरणी त्यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) अटक केली आहे. सीबीआयने त्यांना २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

छोट्या व्यवसायापासून सुरुवात

वेणूगोपाल धूत यांनी आपला व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरु केला होता. नंदलाल माधवलाल धूत हे त्यांचे वडिल होते. वेणूगोपाल धूत यांनी व्हिडिओकाॅनचा विस्तार टिव्हीसह इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणापासून सुरु केला आणि त्यांनतंर तेल आणि गॅस, रिअल इस्टेटमध्येही विस्तार केला.

व्हिडिओकाॅनची सुरुवात

त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कूटूंबात झाला. त्यांच्या वडिलांकडे सूत कातण्याचे मशिन होते. आणि धान्याचे व्यापारीही होते. मात्र १९८२मध्ये कलर टीव्ही सुरु झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाची नवी दिशा मिळाली. पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या धूत यांनी अभियांत्रिकी विषयात पदवी संपादन केली. टेलिव्हिजनच्या निर्मिती प्रक्रिया शिकण्यासाठी ते जपानला रवाना झाले. तिकडून परत भारतात आल्यावर १९८६ मध्ये त्यांननी व्हिडिओकाॅन इंटरनॅशनलचा पाया रचला. कंपनीअंतर्गत देशात वार्षिक एक लाख टीव्ही उत्पादनाचे उदिष्ट त्यांनी ठेवले होते. यानंतर त्यांनी तोशिबा कंपनीसोबत करारही केला होता. अनेक वर्षे टीव्ही उत्पादनात पकड मजबूत केल्यानंतर व्हिडिओकाॅनने फ्रिज, वाॅशिंग मशीन, एसी आण इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणांच्या उत्पादनातही जम बसवला. यादरम्यान कंपनीने ओनिडा, सलोरा आणि वेस्टर्नसारख्या कंपन्यांना त्यांनी पिछाडीवर टाकले.

कंपनीला लागली उतरती कळा

इलेक्ट्राॅनिक उत्पादनात जम बसवतानाच कंपनीने टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रात उडी घेतली. इथपासून कंपनीला उतरती कळा लागली. कंपनीला १८ सर्कलमध्ये लायसेन्सेस मिळाले होते. मात्र कंपनी केवळ ११ सर्कलमध्ये वाणिज्यिक संचार सेवा सुरु करु शकली. वर्ष २०२१ मध्ये १२२ दूरसंचार लायसन्स रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व्हिडिओकाॅन समुहाला भारी पडला. रद्द करण्यात आलेल्या लायसेसन्सपैकी २१ केवळ व्हिडिओकाॅनचे होते. दरम्यान, त्यानंतर झालेल्या स्पेक्ट्रम निलामीनंतर कंपनीला ६ सर्कलचे लायसेन्सेस मिळाले. पण कंपनीने एअरटेलला आपला व्यवसाय विकून दूरसंचार क्षेत्रातून माघार घेतली.

याशिवाय ९० च्या दशकात एलजी, सॅमसंग आणि सोनीच्या भारतातील आगमनानंतर व्हिडिओकाॅन कंपनीला स्पर्धा निर्माण झाली. परिणामी कंपनीचा बाजार हिस्सा कमी होऊ लागला. कंपनीवर कर्जाचा बोझा वाढला. कर्ज वसूली न झाल्याने बॅकांनी २०१८ मध्ये कंपनीवर दिवाळखोरी प्रक्रिया सुरु केली.

दरम्यान, अनिल अगरवाल यांच्या ट्विनस्टार टेक्नाॅलाॅजीजने लावलेली अंदाजे २, ६९२ कोटींची बोली एनसीएलटीने मंजूर केली. त्यानंतर तीदेखील विविध विवादामध्ये अडकली. आजही व्हिडिओकाॅनच्या कर्जदारांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत.

Whats_app_banner