पाच वर्षांत ३६००० टक्के वाढला कंपनीचा शेअर! आता एका शेअरवर २ शेअर मोफत आणि डिविडंडही मिळणार! तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पाच वर्षांत ३६००० टक्के वाढला कंपनीचा शेअर! आता एका शेअरवर २ शेअर मोफत आणि डिविडंडही मिळणार! तुमच्याकडं आहे का?

पाच वर्षांत ३६००० टक्के वाढला कंपनीचा शेअर! आता एका शेअरवर २ शेअर मोफत आणि डिविडंडही मिळणार! तुमच्याकडं आहे का?

Jan 12, 2025 08:21 PM IST

Vantage Knowledge Academy share Price : व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमी या शिक्षण क्षेत्राशी संबंधित कंपनी २०२५ या वर्षासाठी लाभांश आणि बोनस शेअर जाहीर केला आहे.

पाच वर्षांत ३६००० टक्के वाढला कंपनीचा शेअर! आता एका शेअरवर २ शेअर मोफत आणि डिविडंडही मिळणार! तुमच्याकडं आहे का?
पाच वर्षांत ३६००० टक्के वाढला कंपनीचा शेअर! आता एका शेअरवर २ शेअर मोफत आणि डिविडंडही मिळणार! तुमच्याकडं आहे का?

Share Market News : शेअर बाजारात काही छोट्या कंपन्यांनी अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे. व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमी या शैक्षणिक कंपनीचा शेअर यापैकीच एक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये या कंपनीनं जबरदस्त नफा कमावला आहे. आता या कंपनीनं बोनस शेअर्स आणि डिविडंडचीही घोषणा केली आहे.

व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमी ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनी विविध उद्योगांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण साहित्य आणि प्रमाणपत्रांचा पुरवठा करते. बीएसई अ‍ॅनालिटिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत कंपनीचा शेअर ९१ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या ६ महिन्यांतच त्यात ३८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात तो १८०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. सध्या शेअरचा भाव २२८ रुपयांच्या पातळीवर आहे. 

व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमीचा शेअर बीएसईवर २७०.७० ते ११.७१ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या रेंजमध्ये आहे. शुक्रवारी हा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २२८.१० रुपयांवर बंद झाला.

१० हजारांचे झाले ३६ लाख

पाच वर्षांपूर्वी जानेवारी २०२० मध्ये शेअर बाजारात हा शेअर १ रुपयाच्या खाली व्यवहार करत होता. जर कोणी व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमीच्या शेअर्समध्ये फक्त १०,००० रुपये (१० जानेवारी २०२० रोजी ०.६३ रुपये) गुंतवले असते तर त्यांची गुंतवणूक आज ३६ लाख रुपयांपर्यंत वाढली असती. गेल्या ५ वर्षात या शेअरनं ३६१०६.३५ टक्के परतावा दिला आहे.

व्हेंटेज नॉलेज अ‍ॅकॅडमी डिव्हिडंड, बोनस इश्यू

आता कंपनी २०२५ या आर्थिक वर्षासाठी आपल्या भागधारकांना अंतरिम लाभांश आणि बोनस शेअर देणार आहे. गेल्या आठवड्यात स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं आर्थिक वर्ष २०२५ साठी पहिल्या अंतरिम लाभांशाचा विचार केला आहे आणि त्याला मंजुरी दिली आहे. १ रुपये अंकित मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर ०.१० रुपये डिविडंड दिला जाणार आहे. यासाठी मंगळवार, १७ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. तर, कंपनीच्या संचालक मंडळानं २:१ या प्रमाणात बोनस देण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी अद्याप रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलेली नाही.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner