Vakrangee Share : एक करार काय जादू करू शकतो ते स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दाखवून दिलं!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vakrangee Share : एक करार काय जादू करू शकतो ते स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दाखवून दिलं!

Vakrangee Share : एक करार काय जादू करू शकतो ते स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दाखवून दिलं!

Jan 07, 2025 05:34 PM IST

Vakrangee Share Price : वक्रंगीचे शेअर मंगळवारी 4% वाढले, 34.73 रुपयांवर पोहोचले. बँक ऑफ बडोदासोबतच्या कराराचे नूतनीकरण ही वाढीची मुख्य कारण आहे. एक महिन्यात 28% आणि सहा महिन्यात 50% वाढ झाली आहे.

Vakrangee Shrae : एक करार काय जादू करू शकतो ते स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दाखवून दिलं!
Vakrangee Shrae : एक करार काय जादू करू शकतो ते स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दाखवून दिलं!

Smallcap Stock Price News : एक करार शेअर बाजारात काय जादू करू शकतो ते वक्रांगी लिमिटेडच्या शेअरनं आज दाखवून दिलं. आज हा शेअर जोरदार चर्चेत होता. हा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढून ३४.७३ रुपयांवर पोहोचला. बीएसईवर वक्रंगीचा शेअर ४.४५ टक्क्यांनी वधारून ३४.७३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

वक्रांगी लिमिटेडनं बँक ऑफ बडोदासोबत पॅन इंडिया तत्त्वावर बँकिंग सेवा पुरवण्याच्या कराराचं नूतनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळं भारतभरातील वक्रांगी सेंटर आउटलेट्सच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डन्ट (BC) बँकिंग आणि सर्वसमावेशक वित्तीय समावेशन (FI) सेवा सुरू राहतील. कंपनीचे १४,००० हून अधिक बँकिंग बीसी पॉईंट्स आहेत. 

बँक ऑफ बडोदासोबतच्या करार नूतनीकरणामुळं देशभरातील सर्व वक्रंगी केंद्रांवर बँकिंग बीसी पॉईंट सेवेची वाढ आणि सक्रियता सुनिश्चित होईल, अशी माहिती वक्रांगीनं शेअर बाजाराला दिली आहे. ही बातमी पसरताच गुंतवणूकदारांनी वक्रांगीचा शेअर घेण्यासाठी गर्दी केली.

कशी आहे शेअरची वाटचाल?

एका महिन्यात वक्रांगीच्या शेअरची किंमत २८ टक्क्यांहून अधिक वाढली असून सहा महिन्यांत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात स्मॉल कॅप शेअर्समध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वक्रांगीच्या शेअरनं १ ऑक्टोबर २०२४ रोजी ५२ आठवड्यांचा ३७.७२ रुपयांचा उच्चांक आणि ४ जून २०२४ रोजी ५२ आठवड्यांचा १८.४५ रुपयांचा नीचांक गाठला होता. हा शेअर ८ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ५२ टक्क्यांनी घसरला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner