‘एआय’ची अशीही कमाल! आवाजावरून बिल्डरला कळणार संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक-use of artificial intelligence ai technology is also starting in the construction sector ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ‘एआय’ची अशीही कमाल! आवाजावरून बिल्डरला कळणार संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक

‘एआय’ची अशीही कमाल! आवाजावरून बिल्डरला कळणार संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक

Oct 01, 2024 01:18 PM IST

AI technology : आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आज अनेक क्षेत्रात क्रांति केली आहे. आता एआय तंत्रज्ञानाचा वापर बांधकाम क्षेत्रातही करण्यात येत असून ग्राहक शोधण्यापासून ते घरांच्या थ्रीडी रचना करण्यापर्यंत एआयचा वापर केला जात आहे.

आवाजावरून बिल्डरला कळणार संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
आवाजावरून बिल्डरला कळणार संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक

AI technology : आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आज अनेक क्षेत्रात क्रांति केली आहे. व्हिडिओग्राफी पासून ते संगणक क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे. या तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आता बांधकाम क्षेत्रातही केला आजात आहे. या तंत्रज्ञानाचा बिल्डरला मोठा फायदा होणार आहे. घर खरेदी साठी ग्राहक शोधण्यापासून ते घरांची थ्रीडी रचना तयार करण्यासाठी आज एआयचा प्रामुख्याने वापर केला आजात आहे. या सोबतच बांधकाम प्रकल्पासाठीची मंजुरी व कागदपत्रे याची देखील माहिती या माध्यमातून सहजपणे मिळू लागली आहे. या बाबतचे तंत्रज्ञात ‘सिरस.एआय’ या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात घर खरेदीचा अनुभव देखील बदलणार आहे.

एआय तंत्रज्ञानामुळे गोष्टी मोठ्या प्रमाणात सुलभ झाला आहे. बांधकाम क्षेत्रात देखील याचा फायदा व्हावा या उद्देशाने घर घरेदीचा अनुभव भविष्यात बदलणार आहे. मोठ्या शहरात चांगली आणि बजेट फ्रेंडली घरे कुठे आहेत, याची माहिती सिरस.एआय या अॅप्लिकेशन द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. तसेच बिल्डरला देखील संभाव्य घर खरेडीदाराबद्दल या अॅप्लिकेशनमधून माहिती मिळणार आहे. या बाबत या कंपनीचे कार्यकारी अधिकारी सौविक बॅनर्जी यांनी माहिती देतांना सांगितले की, बांधकाम क्षेत्रात चांगल्या सेवा देण्यासाठी या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली असून या द्वारे बिल्डरला ग्राहक शोधण्यापासून ते घर ग्राहकांना ताब्यात देण्यापर्यंतच्या गोष्टी एआयद्वारे करण्यात येणार आहे. बिल्डरच्या कार्यालयात घर खरेदीसाठी चौकशी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या आवाजावरून कोणता ग्राहक घर खरेदी करू शकतो हे एआय तंत्रज्ञान बिल्डरला सांगणार आहे. त्यानुसार बिल्डर संबंधित फ्लॅटची विक्रीचे नियोजन करू शकणार आहे.

प्रकल्प निर्मितीसाठी ठरणार फायदेशीर

राज्यात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सुरू आहे. घरांची व बिल्डिंगची निर्मिती करतांना प्रकल्पाची रचना ही थ्रीडीमध्ये करून त्याचे मॉडेल तयार केले जाते. बहुतांश बिल्डर हे सर्व त्रयस्थ संस्थेकडून करून घेत असतात. मात्र, एआयच्या मदतीने हे सर्व बिल्डरला करणे शक्य होणार आहे. यासाठी ‘सिरस.एआय’ अॅप्लिकेशनमध्ये विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सोबतच माहितीपत्रके, इतर प्रसिद्धी साहित्य एआयच्या माध्यमातून तयार करता येणार आहे. या साठी दुसऱ्या संस्थेला पैसे देऊन काम करून घेण्याची गरज बिल्डरला पडणार नाही, असे बॅनर्जी म्हणाले.

Whats_app_banner