Rules Changing From 1st April : नवे आर्थिक वर्ष उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होत आहे. हे आर्थिक वर्ष सुरू होताच अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये यूपीआय पेमेंटपासून ते बँकांमध्ये कमीत कमी पैसे ठेवण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया या सर्वांबद्दल -
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआयसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना (पीएसपी) आता दर आठवड्याला आपले नंबर अपडेट करावे लागतील. अशापरिस्थितीत ते यूपीआय आयडी बराच काळ अॅक्टिव्ह नसतील, ते बंद होऊ शकतात. त्यातून त्रुटीमुक्त व्यवहार करण्याचा एनपीसीआयचा प्रयत्न आहे.
जीएसटी पोर्टल सुरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून पोर्टलवर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (एमएफए) लागू होणार आहे. ही प्रणाली सुरू झाल्याने करदात्यांशी होणारी फसवणूक कमी होणार आहे. याशिवाय ज्यांचे आधार दस्तऐवज १८० दिवसांपेक्षा जुने नाहीत, त्यांच्यासाठी आता ई-वे बिल तयार करता येणार आहे.
एसबीआय सिम्पलीक्लिक आणि एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आता रिवॉर्ड पॉईंट सिस्टममध्ये पाहता येईल. अॅक्सिस बँक आपले विस्तारा क्रेडिट कार्ड अपडेट करत आहे. विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन झाली आहे.
१२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षापासून कोणताही कर भरावा लागणार नाही. पगारदार कर्मचाऱ्यांना ७५,००० रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. त्यामुळे नव्या करप्रणालीत १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या करात सूट मिळणार आहे. नव्या कर प्रणालीअंतर्गत टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकेसह बहुतांश बँका १ एप्रिलपासून मिनिमम बॅलन्स लिमिटमध्ये बदल करत आहेत. यापेक्षा कमी पैसे ठेवल्यास या बँकांच्या ग्राहकांना दंड भरावा लागणार आहे.
संबंधित बातम्या