सॅमसंग अवघ्या काही दिवसात आपली गॅलेक्सी एस २५ सीरिज लाँच करणार आहे, ज्यात एस २५ अल्ट्रा, एस २५ प्रो आणि एस २५ या तीन मुख्य मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. सॅमसंगची ही सीरीज कधी लाँच होणार आहे? याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, त्यापूर्वीच या स्मार्टफोनबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आली आहे.
टिप्सटर इव्हान ब्लास यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, सॅमसंग एस २५ लाइनअपची तिन्ही मॉडेल्स प्रत्येकी चार रंगांमध्ये येतील. एस २५ अल्ट्रापासून सुरू होणारा हा फोन स्टँडर्ड ब्लॅक फिनिश, व्हाईट, ग्रे फिनिश आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे, याबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. लवकरच याबाबत कंपनीकडून स्पष्ट केले जाईल.
अधिकृत एस २५ मालिकेच्या घोषणेस अवघे काही दिवस शिल्लक असताना, आमच्याकडे मालिकेबद्दल बरेच तपशील आहेत, ज्यात त्यांना शक्ती देणार्या चिपसेटचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, सॅमसंग यावेळी स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट बाजारात आणणार आहे, जे उच्च-कार्यक्षमता आणि वैशिष्ट्य-समृद्ध स्मार्टफोनच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी असू शकते. याव्यतिरिक्त, एस 25 लाइनअपसाठी बेस रॅम 12 जीबीपर्यंत वाढविली जाईल आणि अशी शक्यता आहे की सॅमसंग एस 25 सीरिजमध्ये अँड्रॉइड 15 वर आधारित वन यूआय 7 असेल.
संबंधित बातम्या