Redmi K70 Ultra: १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह बाजारात येतोय रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोन, लॉन्च होण्यापूर्वीच फीचर्स लीक!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Redmi K70 Ultra: १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह बाजारात येतोय रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोन, लॉन्च होण्यापूर्वीच फीचर्स लीक!

Redmi K70 Ultra: १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह बाजारात येतोय रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोन, लॉन्च होण्यापूर्वीच फीचर्स लीक!

Dec 31, 2023 08:41 AM IST

Redmi K70 Ultra key specs leaked: लॉन्च होण्यापूर्वीच रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोनची फीचर्स लीक झाली आहे.

Upcoming Smartphones
Upcoming Smartphones

Redmi Smartphones: स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी त्यांचा आगामी स्मार्टफोन रेडमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती समोर आली. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षी भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने या वर्षी ऑगस्ट महिन्यात रेडमी के ६० स्मार्टफोन लॉन्च केला होता, त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच गेल्या नोव्हेंबरमध्ये रेडमी के ७० अल्ट्रा लॉन्च केला. रेडमीच्या के सीरिज स्मार्टफोनमध्ये रेडमी के ७०, रेडमी के ७० प्रो आणि रेडमी के ७० ई यांचा समावेश आहे.

रेडमी के ७० अल्ट्रा हा स्मार्टफोन पोकोच्या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारात पदार्पण करतील. टिपस्टर डिजिटल पॅट स्टेशनने याआधी या स्मार्टफोनच्या प्रमुख फीचर्सबद्दल माहिती दिली होती. टिपरने त्यांच्या नवीन पोस्टद्वारे फोनच्या डिस्प्ले कसा असू शकतो, याबाबत सांगितले आहे. शाओमी के ७० अल्ट्रा स्मार्टफोन एलटीपीओ तंत्रज्ञानासह 8T OLED डिस्प्लेसह सुसज्ज असेल, असाही दावा केला जात आहे.

शाओमी 1.5K किंवा 2K रिझोल्यूशनसह 8T OLED डिस्प्ले देऊ शकते. शाओमी डिस्प्लेच्या चारही बाजूंनी पातळ बेझलसह स्मार्टफोन लॉन्च करेल. आगामी रेडमी स्मार्टफोनमध्ये 4nm प्रक्रियेवर तयार केलेला MediaTek Dimensity 9300 चिपसेट असेल. टिपस्टरने हे देखील उघड केले आहे की, शाओमीचा हॅनिला रेडमी के ७० आणि रेडमी के ७० प्रो स्मार्टफोनच्या तुलनेत शाओमी के ७० अल्ट्रामध्ये अनेक सुधारणा केल्या जातील.

लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा Sony IMX LYTIA 800 प्राइमरी सेन्सर असेल. प्राथमिक सेन्सर OIS सपोर्ट करेल आणि १०८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्ससह जोडला जाईल. याशिवाय, ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner