POCO: व्हर्टिकल कॅमेऱ्यासह येत आहे पोकोचा जबरदस्त 5G फोन, फोटो झाले लीक!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  POCO: व्हर्टिकल कॅमेऱ्यासह येत आहे पोकोचा जबरदस्त 5G फोन, फोटो झाले लीक!

POCO: व्हर्टिकल कॅमेऱ्यासह येत आहे पोकोचा जबरदस्त 5G फोन, फोटो झाले लीक!

Dec 24, 2024 09:25 PM IST

Upcoming Smartphones: लवकरच पोकोची एक्स ७ सीरिज 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

व्हर्टिकल कॅमेऱ्यासह येत आहे पोकोचा जबरदस्त 5G फोन
व्हर्टिकल कॅमेऱ्यासह येत आहे पोकोचा जबरदस्त 5G फोन

Poco Smartphones: पोको कंपनीची एक्स ७ सीरिज लवकरच भारतासह निवडक जागतिक बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप पोको एक्स ७ 5G सीरिजच्या स्मार्टफोनच्या लाँचिंगची पुष्टी केलेली नसली तरी कथित फोनचे ग्लोबल आणि भारतीय व्हेरियंटचे फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. एका टिप्सटरने पोको एक्स ७ प्रो 5G स्मार्टफोनचे डिझाइन रेंडर आणि विशेष स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत. हायपरओएस २.० सोबत भारतात येणारा हा पहिला फोन असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले.

टिप्सटर पारस गुगलानी यांनी एका एक्स पोस्टमध्ये पोको एक्स ७ प्रो 5G ग्लोबल व्हेरिएंटचे लीक डिझाइन रेंडर्स शेअर केले आहेत. लीक झालेल्या रेंडरमध्ये फोन तीन कलर ऑप्शनमध्ये पाहता येईल, ज्यात ड्युअल टोन फिनिश ब्लॅक आणि ग्रीन व्हेरियंटमध्ये दिसत आहे. तर, तिसरा ऑप्शन ब्लॅक आणि यलोच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसू शकतो. मागील पॅनेलच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल ठेवण्यात आले. त्याच्या शेजारी एक लांबलचक एलईडी फ्लॅश युनिट दिसत आहे. कॅमेरा सेटअपच्या शेजारी लिहिलेल्या मजकुरावरून फोनमध्ये ओआयएस सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल. मागील पॅनेल खालच्या डाव्या बाजूला उभ्या स्थितीत लिहिलेले आहे.

पोको एक्स ७ प्रो 5G स्पेसिफिकेशन्स (लीकनुसार)

  • टिप्स्टरने सांगितले की, पोको एक्स 7 प्रो 5G च्या ग्लोबल व्हेरिएंटमध्ये ४ एनएम मीडियाटेक डायमेंसिटी ८४००० अल्ट्रा चिपसेटद्वारे चालविले जाऊ शकते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात १७ लाख ४ हजार ३३० अँटुटू स्कोअर आणि ५० टक्के एआय परफॉर्मन्स बूस्ट असल्याचे सांगितले जात आहे. हा स्मार्टफोन लिक्विडकूल ४.० कूलिंग सिस्टीमने सुसज्ज असून अँड्रॉइड १५ वर आधारित हायपरओएस २.० सोबत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • फोटोग्राफीसाठी फोनच्या ग्लोबल व्हेरियंटमध्ये एफ/१.५ अपर्चर आणि ओआयएससह ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८८२ प्रायमरी सेन्सर, तसेच 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २५६० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ३२०० निट्स पीक ब्राइटनेस लेव्हलसह ६.६७ इंचाचा क्रिस्टलरेज १.५ के एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

  • फोनच्या ग्लोबल व्हेरियंटमध्ये ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १४.५ तासांपर्यंत बॅटरी लाइफ देईल असे म्हटले जात आहे. यात ९० वॅट वायर्ड हायपरचार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे, जी फोन ४२ मिनिटांत शून्य ते १०० पर्यंत चार्ज करू शकते.

Whats_app_banner