Upcoming Smartphones: स्मार्टफोन युजर्ससाठी पुढचा महिना खूपच रोमांचक असणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक नवे स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये आयक्यूओ १३, विवो एक्स २००, वनप्लस १३ आणि पोको एफ ७ सह टेक्नो फँटम व्ही फोल्ड २ आणि फँटम व्ही फ्लिप २ यांचा समावेश आहे. या फोनमध्ये ग्राहकांना दमदार फीचर्स मिळणार आहेत.
आयक्यूओओचा हा फोन ३ डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८ एलिट देत आहे. अँटुटू स्कोअरमध्ये फोनला ३ दशलक्षाहून अधिक स्कोअर मिळाला आहे. या अपकमिंग फोनमध्ये तुम्हाला ६००० एमएएचची बॅटरी आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग मिळेल. हा फोन आयपी ६८ आणि आयपी ६९ रेटिंगसह सुसज्ज असेल. फोनच्या चायना व्हेरियंटमध्ये ६.८२ इंचाचा 2K + १४४ हर्ट्झ बीओई क्यू १० एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल ४५०० निट्स आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा तीन रिअर कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
भारतात १३ डिसेंबरला दाखल होण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनचा वनप्लस वॉच ३ देखील लॉन्च करू शकते. वनप्लस १३ च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी आपल्या चीन व्हेरियंटमध्ये ६.८२ इंचाचा बीओई एक्स २ 2K + एमोलेड डिस्प्ले ऑफर करत आहे, ज्याची पीक ब्राइटनेस लेव्हल ४५०० निट्स आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८ एलिटचा वापर करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सोनी एलवायटी ८०८ प्रायमरी सेन्सरसह ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये दिलेली ही बॅटरी १०० वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
विवोचे फोन डिसेंबरच्या मध्यात भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर विवो एक्स २०० मध्ये कंपनी मीडियाटेक ९४०० प्रोसेसर सह १६ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज देऊ शकते. एक्स २०० मध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा टेलिमॅक्रो सेन्सर मिळेल. तर, एक्स २०० प्रोमध्ये तुम्हाला २०० मेगापिक्सलचा टेलिमॅक्रो सेन्सर मिळू शकतो. कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा ही देणार आहे. या डिव्हाइसचा सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा असेल.
कंपनी पुढील महिन्यात हे दोन्ही फोन भारतात लॉन्च करू शकते. फँटम व्ही फ्लिप २ हे इनफिनिक्स झिरो फ्लिपचे रिब्रँडेड व्हर्जन असल्याचे म्हटले जात आहे. यात ६.९ इंचाचा प्रायमरी आणि ३.६४ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये डायमेंसिटी ८०२० चिपसेट देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ४ हजार ७२० एमएएचची असून ७० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचा मेन कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. व्ही फोल्ड २ बद्दल बोलायचे झाले तर हा फोन ७.८५ इंचाचा इनर आणि ६.४२ इंचाचा आउटर डिस्प्लेसह येईल. हे डायमेंसिटी ९०००+ प्रोसेसरवर काम करते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे आहेत. याचा सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे.