अवघ्या ११ हजारांत आयफोनसारखा लूक आणि २५६ जीबी स्टोरेज; इन्फिनिक्सच्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या ११ हजारांत आयफोनसारखा लूक आणि २५६ जीबी स्टोरेज; इन्फिनिक्सच्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा

अवघ्या ११ हजारांत आयफोनसारखा लूक आणि २५६ जीबी स्टोरेज; इन्फिनिक्सच्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा

Published Feb 03, 2024 04:55 PM IST

Infinix Hot 40i: इन्फिनिक्स हॉट ४० आय हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

Infinix Hot 40i
Infinix Hot 40i

Infinix Hot 40i Price Leaked: इन्फिनिक्स कंपनीच्या स्मार्टफोनला ग्राहकांकडून मोठी पसंती दर्शवली जात आहे. इन्फिनिक्स कंपनी त्यांचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ९१ मोबाईल्सच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, इन्फिनिक्स हॉट ४० आय स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. हा फोन फेब्रुवारीच्या पहिल्या सहामाहीत विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. इन्फिनिक्स येत्या काही दिवसात भारतात फोनच्या अधिकृत लॉन्चची घोषणा करू शकते.

इन्फिनिक्स कंपनीचा आगामी स्मार्टफोन इन्फिनिक्स हॉट ४० आय सीरिजमधील पहिला डिव्हाइस असेल. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात दाखल होईल. २५६ जीबी स्टोरेज असलेला हा फोन भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरणार आहे. जागतिक बाजारात हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सौदी अरेबियामध्ये लॉन्च झाला आहे, जिथे या फोनची किंमत (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत SAR ३७५ (अंदाजे ८ हजार ४०० रुपये) आणि ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत SAR ४६५ (अंदाजे १० हजार ४०० रुपये) आहे.

इन्फिनिक्स हॉट ४० आय मध्ये ८ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन मागील मॉडेलप्रमाणेच फ्लिपकार्टद्वारे उपलब्ध होईल. स्मार्टफोनच्या भारतीय प्रकारातील इतर वैशिष्ट्ये जागतिक प्रकाराप्रमाणेच राहण्याची अपेक्षा आहे. आगामी फोनमध्ये काय खास असेल? हे जाणून घेऊयात.

या फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे, जो ७२० x १६१२ पिक्सेल रिझोल्यूशन ९०Hz रिफ्रेश रेट, सेंट्रेड पंच-होल कटआउट आणि ४०० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम/ ८ जीबी रॅम रॅम आणि १२८ जीबी/२५६ जीबी स्टोरेज मिळत आहे. तसेच फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ग्राहकांना ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, वाय- फाय, ब्लूटूथ, 4G, यूएसबी टाइप-सी आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक देखील उपलब्ध आहेत.

Whats_app_banner