Motorola Edge 50 Series: मोटोरोला कंपनीचा नवा स्मार्टफोन मोटोरोला एज ५० सीरिज लवकरच भारतीय बाजारात दाखल होत आहे. हा स्मार्टफोन येत्या ०३ एप्रिल २०२४ रोजी लॉन्च होणार आहे. या सीरिजमध्ये मोटोरोला एज ५० प्रोचा समावेश आहे, ज्या स्मार्टफोनला एआय फीचर्ससह टीज करण्यात आले.हा फोन बाजारात दाखल झाल्यानंतर धुमाकूळ घालेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
इ- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर मोटोरोला एज ५० प्रो एआय फीचर्ससह वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला. दुसरीकडे, मोटोरोला आपल्या अधिकृत एक्स हँडलवरही या स्मार्टफोनला टीज करीत आहे. फ्लिपकार्टनुसार, मोटोरोला एज ५० प्रोमध्ये एआय वॉलपेपरचा समावेश असेल. या फोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजमधील काही फीचर्स असू शकतात. मोटोरोला एज ५० प्रो कॅमेरा एआयद्वारे संचालित असेल. एआय कॅमेरा फीचर्समध्ये एआय अॅडॉप्टिव्ह स्टॅबिलायझेशन, ऑटो-फोकस ट्रॅकिंग, एआय फोटो एन्हान्समेंट आणि बरेच काही असेल. मोटोरोला अधिकृत लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनबद्दल खुलासा करू शकते.
फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, मोटोरोला एज ५० प्रो मध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.७ इंचाचा पीओएलईडी १.५ के डिस्प्ले असेल. याव्यतिरिक्त, हा जगातील पहिला पॅन्टोन-व्हॅलिफाइड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे, ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा एआय-संचालित प्रो-ग्रेड कॅमेरा असेल, अशी माहिती आहे.
अभिषेक यादव एक्सच्या पोस्टनुसार, स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. मोटोरोला एज ५० प्रो मध्ये ४५०० एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी १२५ वॅट वायर्ड चार्जिंग आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालेल. मोटोरोला एज 50 प्रोची अधिकृत घोषणा ०३ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. त्यानंतरच या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अधिकृत माहिती समोर येईल.