Upcoming 7 Seater SUV : फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी रेनॉल्ट आपल्या नव्या मॉडेल्ससह भारतीय बाजारपेठेत मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. सध्या रेनॉल्ट भारतात क्विड हॅचबॅक, काइगर सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि ट्रायबर एमपीव्ही सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची विक्री करत आहे. आता कंपनी २०२५ च्या उत्तरार्धात नवीन जनरेशन ट्रायबर एमपीव्ही आणि काइगर एसयूव्ही लॉन्च करण्याची योजना आखत आहे. तसेच कंपनी २०२६ मध्ये नवीन रेनॉल्ट डस्टर एसयूव्ही लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या जनरेशनच्या रेनॉल्ट काइगर कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा केली जा ही कार कत आहे. त्यामुळे ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या कारमध्ये नवीन फ्रंट प्रोफाइल आणि रिडिझाइन लाइटिंग सेटअप मिळेल. याशिवाय, नवीन अलॉय व्हील डिझाइन पाहायला मिळणार आहे. काही डिझाइन रेनॉल्ट कार्डियन एसयूव्हीपासून प्रेरित असतील. रेनॉल्ट काइगरच्या इंटिरिअरमध्ये अनेक नवे फीचर्स मिळणार आहेत. यात अपडेटेट इन्फोटेनमेंट सिस्टिम पाहायला मिळणार आहे.
यांत्रिक बदल होण्याची शक्यता कमी असते. यात १.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश असेल.
रेनो ट्रायबर एमपीव्ही नवीन डिझाइन आणि एमपीव्हीमध्ये ३-लाइन सीटिंगमुळे भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. ट्रायबरच्या सिल्हूटमध्ये फारसा बदल होणार नसला तरी त्याच्या एक्सटीरियर आणि इंटिरियरमध्ये नवीन लूक पाहायला मिळणार आहे. नवीन ट्रायबरमध्ये अॅडव्हान्स फीचर्स जोडले जातील, यात मोठी टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि उत्तम सेफ्टी फीचर्स असतील. नवीन ट्रायबरमध्ये इंजिन अपग्रेड केले जाईल, ज्यामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.
रेनो डस्टर ही भारतातील बहुप्रतीक्षित एसयूव्हीपैकी एक आहे. त्याची नवीन जेन आधी २०२५ मध्ये लॉन्च होणार होती, पण आता ती २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन झेनची डस्टर एक प्रमुख डिझाइन अपडेट आणि सुधारित कामगिरीसह येईल. हे मॉडेल रेनॉल्टच्या सीएमएफ-बी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामुळे ते अधिक मजबूत आणि आधुनिक होईल. याला पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या