मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC FD plan : एचडीएफसीचा स्पेशल एफडी प्लान दाखल, व्याजदर ऐकूण अचंबित व्हाल !

HDFC FD plan : एचडीएफसीचा स्पेशल एफडी प्लान दाखल, व्याजदर ऐकूण अचंबित व्हाल !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 30, 2023 10:05 PM IST

HDFC FD plan : HDFC बँकेने मर्यादित कालावधीसाठी दोन विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. बँकेने ज्येष्ठ नागरिकांना ०.५० रटक्के अतिरिक्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

Fkixed Deposit HT
Fkixed Deposit HT

HDFC FD plan : खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने मर्यादित कालावधीसाठी दोन विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. दोन्ही एफडीवर दिला जाणाऱ्या व्याजदराद्वारे गुंतवणूकदारांना चांगला लाभ होऊ शकतो. त्याच वेळी, बँकेने ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के अतिरिक्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक ३५ महिन्यांच्या कालावधीसाठी स्पेशल एडिशन फिक्स्ड डिपॉझिट सुरू करत आहे. या कालावधीत, बँक गुंतवणूकदारांना ७.२० टक्के दराने व्याज देईल. याशिवाय एचडीएफसी बँकेने ५५ महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूकदारांना ७.२५ टक्के व्याजदर देऊ केला आहे. त्याच वेळी, बँकेने या कालावधीत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

एचडीएफसी बँकेचे सध्याचे व्याजदर

- एचडीएफसी बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीसाठी एफडी योजना चालवते. बँकेने २९ मे पासून काही कालावधीच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे.

- बँक आता ७ ते २९ दिवसांदरम्यानच्या एफडीवर ३% व्याज दर देत आहे.

- ३० ते ४५ दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या एफडीवर ३.५०% व्याजदर देत आहे.

- ४६ दिवस आणि सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर ४.५०% व्याज जाहीर केले आहे.

- सहा महिने आणि एक दिवस ते नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी ५.७५% व्याजदर दिला जात आहे.

- बँकेने नऊ महिने आणि एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ६ % व्याज दर देऊ केला आहे.

- एक वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ६.६० टक्के व्याजदर दिला जात आहे.

- १५ महिने आणि १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७.१०% व्याजदर दिला जात आहे.

- एचडीएफसी बँक १८ महिने ते २ वर्षे ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७% व्याज दर देत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर

एचडीएफसी बँकेने मे २०२० मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली होती. या विशेष एफडी योजनेंतर्गत, बँक आपल्या गुंतवणूकदारांना इतर एफडीच्या तुलनेत ५ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर देत आहे. बँक एका दिवसापासून ते १० वर्षांच्या पाच वर्षांच्या कालावधीसह स्पेशल केअर एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग